#Tokyo2020 : लव्हलिना बोर्गोहेन बाॅक्सिंग क्रमवारीत तिस-या स्थानी

मेरी कोमची बाॅक्सिंग क्रमवारीत घसरण
नवी दिल्ली : भारताची बाॅक्सिंग आॅलिम्पिकपटू मेरी कोमची आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीच्या (आयओसी) बाॅक्सिंग टास्क फोर्स क्रमवारीमध्ये घसरण झाली आहे.
महिला क्रमवारीत सहा वेळा जगज्जेती ठरलेल्या मेरी कोम हिला ५१ किलो गटात पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागावे आहे. तर, लव्हलिना बोर्गेहेन हिने ६९ किलो वजनी गटात तिसरे स्थान मिळवले आहे.
Great news for India as @boxerpanghal becomes the world #1 in men’s 52 kg in latest world rankings released by @iocmedia Task Force. He becomes 1st Indian male since 2009 to reach the top. @lovlinaborgohai at World #3 in 69 kg is the highest ranked women’s boxer@KirenRijiju pic.twitter.com/j7vTDkgVfa
— SAI Media (@Media_SAI) February 13, 2020
अन्य भारतीय महिला बाॅक्सिंगपटूमध्ये निखत झरीन हिने ७५ गुणांसह २२ वे स्थान प्राप्त केले आहे. सोनिया चहल हिने ५७ किलो वजनी गटात दहावे स्थान मिळवले आहे. आशियाई आॅलिम्पिक पात्रता स्पर्धा पुढील महिन्यात जाॅर्डनमध्ये होणार आहे.





