मोकळे केस…जाळीदार फ्रॉक..! रुपेरी वाळूत सोनालीचं सिझलिंग फोटोशूट

Updated On:
Photo 1

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री ‘सोनाली कुलकर्णी’ने आपल्या उत्तम नृत्य शैलीने आणि वेगवेगळ्या भूमिकेने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपले एक स्थान निर्माण केले आहे. सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.

मात्र, सोनालीला खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘नटरंग’ या चित्रपटातून.या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहून अवघ्या महाराष्ट्राला तिने वेडं लावले. सोनालीचे नुकतेच ‘पांडू’ आणि ‘झिम्मा’ नावाचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते. आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ते चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. नुकतंच अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही नवीन फोटो पोस्ट केले असून, सध्या तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

शेअर केलेल्या या फोटोत सोनाली कुलकर्णीचा वाळंवटात बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. भर उन्हात सोनाली कुलकर्णीनं जाळीदार फ्रॉकमध्ये चक्क वाळंवटात आग लागली आहे. या फोटोशूटमध्ये सोनालीनं चिकनचा पांढऱ्या रंगाचा सुंदर फ्रॉक घातला आहे, तिच्या या फोटोशूटनं भर उन्हात सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे. नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव करत याला पसंती दर्शवली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?