Nilesh lanke । Sujay vikhe । Lok Sabha Result 2024 : लोकसभा निवडणुका एकुण सात टप्प्यात पार पडेल. 19 एप्रिलपासून सुरू झालेली मतदानप्रक्रिया 1 जून रोजी संपली. या निवडणुकीत 64.2 कोटी मतदारांनी मतदान केले आहे. या निवडणुकीत एकूण 31.2 कोटी महिलांनी मतदानाचा अधिकार बजावला. अर्थातच त्यानंतर सर्वांच उत्सुकता निकाली लागली होती. तोच लोकसभा निवडणुकीक निकाल आज 4 जून रोजी जाहीर होताना दिसत आहे. देशातील लोकसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून, बरेच निकाल आता स्पष्ट होताना दिसत आहे. महाराष्ट्रात एकूण 48 जागांवर मतदान पार पडले. सध्या महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसताना दिसतोय. तर, दुसरीकडे आघाडी सरकारने अनेक ठिकाणी विजयाचा गुलाल अंगावर उधळला आहे. दरम्यान, राज्याचे लक्ष लागलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात निलेश लंके यांनी सुजय विखे पाटलांना जोर का झटका देत मोठी आघाडी घेतली आहे. निलेश लंके विजयी झाले असून, सुजय विखेंचा पराजय झाला आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके विरुद्ध महायुतीचे सुजय विखे यांच्यामध्ये अटीतटीची लढत होती. सुरूवातीच्या कलानुसार निलेश लंंके यांनी सुजय विखे यांना जोरदार टक्कर देत मोठी आघाडी घेतली होती.