Naxal Affected Area । देशातील लोकसभा निवडणुकीला आज सुरुवात झालीय. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात एकूण १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली. यात देशातील १९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांच्या जागांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात १६.६३ कोटी मतदार १.८७ लाख मतदान केंद्रांवर जाऊन त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्व मतदान केंद्रांवर चोख व्यवस्था करण्यात आली. १८ लाख कर्मचारी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेचा कारभार सांभाळत आहेत.
नक्षलग्रस्त भागात ३ वाजेपर्यंतच मतदान Naxal Affected Area ।
मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी आहे. मात्र, गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील आमगाव, आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी ही चार विधानसभा क्षेत्रे नक्षलग्रस्त आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तेथे सकाळी ७ वाजता मतदान सुरू होणार आहे. दुपारी ३ वाजता संपेल. ब्रह्मपुरी आणि चिमूर या दोन विधानसभा क्षेत्रांत मात्र सायंकाळी ६ पर्यंत मतदान होणार आहे.
मतदारांसाठी सुविधा Naxal Affected Area ।
* १०२ मतदार केंद्रांमध्ये १४. १४ लाखांहून अधिक नोंदणीकृत ८५ वर्षांहून अधिक वयोगटातील मतदार आहेत तसेच, १३.८९ लाख अपंग मतदार असून त्यांना त्यांच्या घरी मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
* या मतदारांनी मतदान केंद्रांवर येण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानयंत्रांवर ब्रेल चिन्हेही असतील. स्वयंसेवक सर्व सुविधा पुरवल्या जातील. अपंग मतदारांनी ECI Saksham अॅपद्वारे व्हीलचेअर सुविधेसाठी नोंदणी करता येईल.
* वृद्ध आणि अपंग व्यक्तींसह प्रत्येक मतदार सुलभतेने मतदान करू शकतील. त्यासाठी पाणी, आडोसा, शौचालय, रॅम्प, स्वयंसेवक, व्हीलचेअर आणि वीज यांसारख्या किमान सुविधा उपलब्ध आहेत.
* ५ हजारांहून अधिक मतदान केंद्रांचे व्यवस्थापन अगदी सुरक्षा कर्मचाऱ्यांसह महिलांद्वारे केले जाईल. १ हजारहून अधिक मतदान केंद्रांचे अपंग व्यक्ती व्यवस्थापन करतील.
* सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदार माहितीपत्रिका (स्लिप) देण्यात आल्या आहेत. त्याचा मतदान केंद्रावर मतदानासाठी उपयुक्त ठरतील. https://electoralsearch.eci.gov.in/ या लिंकद्वारे मतदार त्यांचे मतदान केंद्र तपशील आणि मतदानाच्या तारखेची शहानिशा करता येऊ शकेल.