Lok Sabha Election 2024 : सिक्कीममध्ये मतांच्या टक्क्यात घसरण
Updated On:

गंगटोक – सिक्कीममध्ये लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकांसाठीही शुक्रवारी मतदान झाले. प्राथमिक अंदाजनुसार त्या राज्यातील मतांच्या टक्क्यात यावेळी घसरण झाल्याचे सूचित होत आहे. सिक्कीममध्ये लोकसभेची १, तर विधानसभेच्या ३२ जागा आहेत.
त्या राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे ६८ टक्के, तर लोकसभा निवडणुकीसाठी ६८ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. मागील वेळी (वर्ष २०१९) सिक्कीममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी ७८ टक्के, तर लोकसभा निवडणुकीसाठी ८१ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली होती. अं
तिम आकडेवारी हाती आल्यानंतर यावेळची मतदान टक्केवारी काही प्रमाणात वाढेल. मात्र, मागील वेळेपेक्षा ती कमीच असेल असे सुत्रांकडून सांगण्यात आले. विधानसभा निवडणुकीसाठी १४६, तर लोकसभा निवडणुकीसाठी १४ उमेदवार नशीब आजमावत आहेत.





