Lok Sabha Election 2024 : कॉंग्रेस एक्झिट पोलच्या चर्चेपासून राहणार दूर
Updated On:

Lok Sabha Election 2024 – अखेरच्या टप्प्यासाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) निष्कर्ष जाहीर होतील. त्यासाठी वृत्तवाहिन्यांची लगबग शनिवारी (दि.१ जून) सायंकाळी ६.३० नंतर सुरू होईल.
प्रत्यक्ष निकालाआधी जाहीर होणाऱ्या एक्झिट पोलच्या निष्कर्षांविषयीही देशभरात उत्सुकता असेल. मात्र, त्या एक्झिट पोलशी संबंधित वृत्तवाहिन्यांवरील चर्चेपासून दूर राहण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आहे.
प्रत्यक्ष निकाल ४ जूनला जाहीर होईल. त्याआधी अंदाज बांधणीत सहभागी होण्याचे कुठले कारण आम्हाला दिसत नाही, असे कॉंग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले.





