Lok Sabha Election 2024 : भाजपचा उमेदवार श्रीमंतीत दुसऱ्या क्रमांकावर; संपत्तीचा आकडा ऐकून उडतील होश.!

Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीतील श्रीमंत उमेदवारांच्या यादीत भाजपचे के.विश्वेश्वर रेड्डी देशात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या आणि कुटूंबीयांच्या नावे ४ हजार ५६८ कोटी रूपयांची संपत्ती आहे.
विश्वेश्वर रेड्डी तेलंगणातील चेवेल्ला मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. ते १ हजार २५० कोटी रूपयांच्या संपत्तीचे धनी आहेत. त्यांच्या पत्नी संगीता रेड्डी ३ हजार २०९ कोटी रूपये मुल्याच्या संपत्तीच्या मालकीण आहेत.
त्या अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या सहव्यवस्थापकीय संचालिका आहेत. संगीता यांचे वडील डॉ.सी.प्रताप रेड्डी यांनी तो ग्रुप स्थापन केला. विश्वेश्वर आणि संगीता या दाम्पत्याच्या मुलाच्या नावे इतर संपत्ती आहे.
विश्वेश्वर रेड्डी यांनी आता भारत राष्ट्र समिती नाव धारण केलेल्या आधीच्या तेलंगणा राष्ट्र समितीमधून राजकीय कारकीर्द सुरू केली. त्या पक्षाच्या तिकिटावर ते चेवेल्लामधून खासदार बनले.
नंतर कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांना २०१९ मधील निवडणुकीत अपयश आले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मद्रास विद्यापीठातून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियरींगचे शिक्षण घेतले. त्यानंतर अमेरिकेतून त्यांनी एमएसचे शिक्षण घेतले.





