Lok Sabah Election 2024 : ठरलं.! पंतप्रधान मोदी पुन्हा वाराणसीतून निवडणूक लढणार

Lok Sabah Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच निवडणुकीचं रणशिंग फुंकले आहे. अब की बार 400 पार चा नारा त्यांनी दिला असून, विरोधकांवर हल्लाबोल करण्याची कोणतीही संधी ते सोडत नाहीयेत.
अश्यातच आज, पत्रकार परिषदेत भाजपने आपली लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. भाजपाने 2019 च्या निवडणुकीत ज्या जागा गमावल्या आणि ज्या जागा जिंकल्या त्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये दोन माजी मंत्र्यांनाही तिकीट देण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही तिकीट देण्यात आलं आहे.
वाराणसीमधून पंतप्रधान मोदी लढणार –
– 195 जणांच्या यादीत पहिलं नाव पंतप्रधान मोदींचं
– 34 केंद्रीय मंत्री, राज्यमंत्र्यांचं नाव
– पहिल्या यादीत 28 महिला उमेदवारांचा समावेश
पहिल्या यादीत महाराष्ट्रातल्या नावांचा समावेश नाही –
आज उत्तर प्रदेश-51, प.बंगाल 27, मध्य प्रदेश 24 , गुजरात 15, राजस्थान 15, केरळ-12, तेलंगणा-9 , आसाम-11, झारखंड 11, छत्तीसगढ 11, दिल्ली- 5, जम्मू काश्मीर 2, उत्तराखंड 3, अरुणाचल प्रदेश 2, गोवा 1.





