राज्यात पुन्हा लॉकडाऊनसारखी स्थिती; संजय राऊत म्हणाले…

मुंबई – राज्याला पाऊस आणि पुराने तडाखा दिला आहे. आतापर्यंत सुमारे 100 लोक मृत्युमुखी पडले आहेत. अशावेळी राज्यात सरकारचं अस्तित्वात नाही. पुन्हा लॉकडाऊन झाल्यासारखी स्थिती आहे, असे टीकास्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुरूवारी सोडले.
राज्यात सरकार नाही अन् मंत्रिमंडळही नाही. केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असणे म्हणजे सरकार नाही. आताचे सरकारच अवैध आहे. सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी प्रलंबित आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ रचना होऊ शकलेली नाही, असे राऊत येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही लक्ष्य करून शाब्दिक टोलेबाजी केली. अपात्र ठरू शकणाऱ्यांना मंत्रिपदांची शपथ देऊ नये, अशी विनंती शिवसेनेने राज्यपालांना केली. राज्यपाल कालपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करत होते. आता ते कुठे आहेत? राज्यात पूरस्थिती असताना जनतेला दिलासा देण्यासाठी राज्यपालांनी राजभवनातून बाहेर पडायला हवे, असा शाब्दिक टोमणा राऊत यांनी लगावला.
अर्थमंत्र्यांनी एक आर्थिक ज्योतिषी नियुक्त करावा; माजी केंद्रीय मंत्र्यांचा सल्ला
शिवसेनेचे सुमारे 15 खासदार संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. त्याला फार महत्व देण्याचे राऊत यांनी टाळले. शिवसेनेचे 2024 मधील लोकसभा निवडणुकीनंतरही तेवढे खासदार दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कायदा सगळ्यांसाठी की फक्त मुसलमानांसाठी; वरिष्ठ अधिवक्ता रिझवान अहमद यांचा सवाल





