Liverpool Car Accident | ब्रिटनमधील लिव्हरपूल शहरात सोमवारी आनंदाचे वातावरण होते. प्रीमियर लीग जिंकल्यानंतर, संघ आणि कर्मचारी एका ओपन-टॉप बसमधून शहराच्या मध्यभागी विजय परेड करत होते. रस्त्याच्या कडेला हजारो चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी जमले होते, पण या आनंदाचे एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. कारण या परेडमध्ये एका भरधाव गाडीने गर्दीत घुसल्याने आनंदाचे हे दृश्य अचानक शोकात बदलले. या घटनेत एकूण २७ जण जखमी झाले, ज्यात चार मुलांचा समावेश आहे. मर्सीसाइड पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि कार चालकाला अटक केली, ज्याची ओळख ५३ वर्षीय गोरी ब्रिटिश व्यक्ती म्हणून झाली आहे. मर्सीसाइड पोलिसांच्या मते, ही घटना दहशतवादाशी संबंधित नाही. या प्रकरणावर कॉन्स्टेबल जेनी सिम्सने, “ही एक वेगळी घटना असल्याचे दिसून येते आणि आम्ही याच्याशी संबंधित इतर कोणालाही शोधत नाही.” असे सांगितले. त्यासोबतच या अपघाताकडे दहशतवाद म्हणून पाहिले जात नाही. अपघात रस्ते अपघाताशी संबंधित Liverpool Car Accident | पोलिसांनी पुढे सांगितले की, हे प्रकरण रस्ते अपघाताशी संबंधित आहे. याची चौकशी केली जात आहे आणि आवश्यक पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या घटनेशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक काळी कार गर्दीत घुसते आणि लोकांना ढकलत पुढे सरकते हे स्पष्टपणे दिसून येते. यादरम्यान, अनेक लोक गाडीखाली चिरडले जातात. आपत्कालीन सेवांची भूमिका कौतुकास्पद Liverpool Car Accident | घटनेनंतर तातडीने आपत्कालीन सेवा सुरू करण्यात आल्या. रुग्णवाहिका विभागाने सांगितले की, सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आपत्कालीन सेवांची तत्परता आणि पोलिसांच्या जलद कारवाईमुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्यापासून रोखली गेली. पंतप्रधान केयर स्टारमर यांनी या प्रकरणावर दुःख व्यक्त केले आणि लिव्हरपूलमध्ये जे घडले ते भयानक असल्याचे म्हटले. जखमी किंवा प्रभावित झालेल्या सर्वांसोबत माझ्या संवेदना आहेत. या धक्कादायक घटनेला प्रतिसाद दिल्याबद्दल मी पोलिस आणि आपत्कालीन सेवांचे आभार मानू इच्छितो.