नीना गुप्ता यांची लेक मसाबाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

Masaba Gupta | अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक फॅशन डिझायनर व अभिनेत्री मसाबा गुप्ताच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. मसाबा व सत्यदीप मिश्रा आई-बाबा झाले आहेत. दसऱ्याच्या दिवशी, मसाबा गुप्ताने मुलगी झाल्याची माहिती इंस्टाग्रामवर पोस्टद्वारे दिली.
मसाबा व सत्यदीप यांच्या घरी ११ ऑक्टोबरला लेकीचं आगमन झालं. मसाबाने इन्स्टाग्रामवर लेकीचा फोटो शेअर केला आहे. पहिल्या फोटोत तिने ११ ऑक्टोबरला मुलगी झाली याबाबत माहिती दिली आहे. तर दुसऱ्या फोटोत चिमुकल्या लेकीचा पाय दिसत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अनुष्का शर्मा, आयुष्मान खुराना, दिया मिर्झा, शिल्पा शेट्टी, सोनम कपूर यांनी या पोस्टवर कमेंट करत सत्यदीप व मसाबाला शुभेच्छा दिल्या आहेत.
मसाबा व सत्यदीप या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. मसाबा व सत्यदीप या दोघांनी जानेवारी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर १८ एप्रिल २०२४ रोजी त्यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत आई-बाबा होणार असल्याची बातमी दिली होती.





