Jorge Messi Death : फुटबॉल जगतावर शोककळा! स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेसीवर कोसळला दुःखाचा डोंगर, वडील जॉर्ज मेसी यांचे निधन
Jorge Messi Death : फिफा विश्वचषक २०२६ दरम्यान आपल्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल खूप चिंतेत असलेल्या अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीवर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Lionel Messi Father Jorge Messi Passes Away Age 68 Long Illness : फुटबॉल जगतातील महान खेळाडू लिओनेल मेसी (Lionel Messi) याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मेसीचे वडील जॉर्ज मेसी (Jorge Messi) यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. लिओनेल मेसीला जगातला सर्वोत्तम फुटबॉलपटू बनवण्यात त्याचे वडील जॉर्ज मेसी यांचा सर्वाधिक मोठा वाटा होता. त्यांनी दीर्घकाळ मेसीचे ‘एजंट’ (Agent) म्हणूनही काम पाहिले होते.
वडिलांच्या संघर्षामुळे घडला महान ‘मेसी’!
मेसीच्या फुटबॉल कारकिर्दीत आणि आयुष्यात त्याच्या वडिलांचे स्थान अत्यंत मोलाचे होते. लहानपणी मेसीला ‘ग्रोथ हॉर्मोन’ची (Growth Hormone Deficiency) गंभीर समस्या होती. अशा कठीण परिस्थितीत जॉर्ज मेसी यांनी अनेक अडचणींचा सामना करत आपल्या मुलाच्या उपचारांमध्ये कोणतीही कसर सोडली नव्हती.
El Club Atlético Newell’s Old Boys despide con profundo dolor y pesar a Jorge Messi, quien falleció a los 68 años de edad en la ciudad de Rosario.
Reconocido hincha leproso, empresario y padre del capitán del seleccionado argentino, Lionel Andrés Messi.
Jorge fue el sostén y la… pic.twitter.com/8dFPMRdM9Z
— Newell’s Old Boys (@Newells) August 8, 2026
फिफा वर्ल्ड कप २०२६ दरम्यान मेसीने आपला परिवार कठीण प्रसंगातून जात असल्याचे सांगत वडिलांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. यानंतर कुटुंबीयांनी अधिकृत निवेदन जारी करून जॉर्ज मेसी यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे स्पष्ट केले होते.
वर्ल्ड कप दरम्यान भावुक झाला होता मेसी –
Lionel’s Messi father Jorge Messi passed away at the age of 68 on the 7th of August after battling a long sickness.
This is a very sad moment for all football fans 😢.
Rest in peace and I pray for comfort for the family pic.twitter.com/8sNmEl8yAX
— BIG STEF ❤️ (@REAL_BIG_STEF) August 8, 2026
फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये मेसीच्या कप्तानीत अर्जेंटिनाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती, जिथे स्पेनने त्यांचा १-० ने पराभव केला. या विश्वचषकात अल्गेरियाविरुद्धच्या ग्रुप स्टेज सामन्यात गोल केल्यानंतर मेसी कमालीचा भावुक झाला होता.
सामन्यानंतर रडण्याचे कारण विचारले असता मेसी म्हणाला होता, “माझ्या अश्रूंचा फुटबॉलशी काहीही संबंध नाही; माझे गेल्या काही दिवसांतील आयुष्य अत्यंत कठीण गेले आहे.” मेसीला घडवणारे आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे छत्र हरपल्याने जगभरातील फुटबॉलप्रेमी हळहळ व्यक्त करत आहेत.





