Lionel Messi Record : फुटबॉल जगतात मेस्सीचा नवा विश्वविक्रम! जे पेले अन् मॅराडोनालाही जमला नाही ते करून दाखवलं
Lionel Messi Record : मेस्सीने फिफा विश्वचषकाच्या सलग ८ सामन्यांमध्ये किमान एक गोल करणारा जगातील पहिला खेळाडू बनण्याचा ऐतिहासिक जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Lionel Messi Kylian Mbappe FIFA World Cup 2026 Golden Boot Race : फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ स्पर्धेत ४ जुलैच्या सकाळपर्यंत ‘राउंड ऑफ ३२’ चे सर्व सामने संपुष्टात आले असून आता प्री-क्वार्टर फायनलचे (राउंड ऑफ १६) चित्र स्पष्ट झाले आहे. गतविजेत्या अर्जेंटिनाने अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात केप वर्डेचा ३-२ असा पराभव करत बाद फेरीत धडक मारली आहे. (Lionel Messi Record)
या कठीण सामन्यात अर्जेंटिनाचा स्टार लियोनेल मेस्सी याने पुन्हा एकदा आपल्या जादुई खेळाचे प्रदर्शन करत एक महत्त्वपूर्ण गोल केला. या गोलसह मेस्सीने फिफा विश्वचषकाच्या सलग ८ सामन्यांमध्ये किमान एक गोल करणारा जगातील पहिला खेळाडू बनण्याचा ऐतिहासिक जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
गोल्डन बूटच्या शर्यतीत मेस्सी अव्वल, एम्बाप्पेकडून तगडे आव्हान – (Lionel Messi Record)
✅ First player in history to reach 20 World Cup goals.
✅ First player in history to score in 8 consecutive World Cup matches.
✅ First player in history to score against 14 different national teams at the World Cup.
✅ First player in history to reach 9 World Cup assists
— Football Tweet ⚽ (@Footballtweet) July 4, 2026
लियोनेल मेस्सीला त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत अद्याप एकदाही ‘गोल्डन बूट’ पुरस्कार मिळवता आलेला नाही; मात्र या विश्वचषकात तो हा दुष्काळ संपवण्याच्या उंबरठ्यावर आहे. चालू विश्वचषकात मेस्सीने आतापर्यंत सर्वाधिक ७ गोल करून पहिले स्थान पटकावले आहे. केप वर्डेविरुद्धचा गोल हा मेस्सीचा विश्वचषक इतिहासातील एकूण २० वा गोल ठरला असून तो या यादीतही अव्वल स्थानावर आहे. (Lionel Messi Record)
Another record falls as Lionel Messi becomes the all-time leading assist provider in World Cup history 🐐✨ pic.twitter.com/7m55Kc9A7F
— OneFootball (@OneFootball) July 4, 2026
मेस्सीला या शर्यतीत फ्रान्सचा स्टार किलियन एम्बाप्पे ६ गोल्ससह जोरदार टक्कर देत आहे. तर नॉर्वेचा एर्लिंग हालंड आणि इंग्लंडचा हेरी केन हे दोघे प्रत्येकी ५-५ गोल्ससह संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
७ जुलैला इजिप्तविरुद्ध होणार महामुकाबला – (Lionel Messi Record)
The only player in @FIFAWorldCup history to score in eight successive games… Lionel Messi 👏 pic.twitter.com/yRJCOF0BNT
— FIFA (@FIFAcom) July 3, 2026
‘राउंड ऑफ १६’ मध्ये आता गतविजेत्या अर्जेंटिनासमोर इजिप्तचे मोठे आव्हान असणार आहे. इजिप्तने ‘राउंड ऑफ ३२’ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा खळबळजनक विजय मिळवला होता. अर्जेंटिना आणि इजिप्त यांच्यातील हा बाद फेरीचा हाय-व्होल्टेज सामना भारतीय वेळेनुसार ७ जुलै रोजी रात्री ९:३० वाजता खेळवला जाईल.





