Jaykumar Gore : मंत्री जयकुमार गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप ! सातारा-कोल्हापूर रोडवर जीवघेणा बाइक स्टंट

Jaykumar Gore : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जयकुमार गोरे यांच्या मुलाचे बाइक स्टंटबाजी करतानाचे व्हिडिओ समोर आलेले आहेत. भैय्या पाटील यांनी हा स्टंटबाजीचा व्हिडिओ आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. यानंतर सुरू झालेल्या टिकेमुळे आता जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज गोरे याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे स्टंटबाजीचे व्हिडिओ डिलीट केले आहेत.
भैय्या पाटील यांची पोस्ट काय?
भैय्या पाटील यांनी हा व्हिडिओ ट्विट करत म्हंटले आहे की, ‘ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज गोरे सातारा – कोल्हापूर रोडवर जीवघेणे स्टंट करून स्वत: सोबत इतर लोकांच्या जीविताला धोका निर्माण करत आहे. या स्टंटचे रील्स लाईव्ह स्वत:च्या सोशल मिडियावर टाकून अशा बेकायदेशीर गोष्टीला प्रोत्साहित केले जात आहे. या बाईकला नंबर प्लेट देखील नाही. जयकुमार गोरेंच्या मुलासाठी महाराष्ट्रात राज्य सरकारने वेगळे नियम बनवले का? असा सवाल भैय्या पाटील यांनी विचारला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे गृहमंत्री आहेत का? त्यांनी ठरवावे हे काय सुरू आहे? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज हा सातारा कोल्हापूर रोडवर जीवघेणे स्टंट करून स्वतः सोबत इतर लोकांच्या जिविताला धोका निर्माण करत आहे. या स्टंटचे रील्स लाईव्ह स्वतःच्या सोशल मीडियावर टाकून अशा बेकायदेशीर गोष्टीला प्रोत्साहित केले जात आहे.सदर बाईकला नंबर… pic.twitter.com/kAHXZH74y3
— Bhaiya Patil (@BhaiyaPatil) March 31, 2025




