Sanjay Raut : फडणवीस म्हणाले ‘२०१९ मध्ये मी उद्धव ठाकरेंच्या फोनची वाट पाहत होतो’, आता संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया समोर
Sanjay Raut : बंद दाराआड फक्त राजकीयच चर्चा होते का? आणि झाली असेल तर चांगलंच आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

Sanjay Raut : मुंबईत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे एका मंचारवर कार्यक्रमासाठी आले होते. त्यामुळे आगमी काळात मोठी राजकीय उलाथापालथ होणाऱ्या असल्याच्या चर्चांना हवा मिळाली आहे. या कार्यक्रमापूर्वी या तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेवर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केले आहे.
बंद दाराआड फक्त राजकीयच चर्चा होते का? आणि झाली असेल तर चांगलंच आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. २०१९ मध्ये मी उद्धव ठाकरेंच्या फोनची वाट पाहत होतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमात म्हणाले होते. यावर संजय राऊत म्हणाले “वाट पाहण्याची गरज नाही. राजकीय मार्ग बदलले तरी विचार एक असतो. नाती अशी तुटत नाहीत.” त्यांच्या या सूचक विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
संजय राऊत म्हणाले की “आज तुम्ही ज्या ऐऱ्यागैऱ्यांसोबत बसला आहात. ती खरी शिवसेना नाही. तुम्ही ज्या पद्धतीने शिवसेनेचे तुकडे केले, ज्या पद्धतीने पक्ष चिन्ह चोरून एका दरोडेखोराच्या हातात दिले, ते तुमच्या मनाला खात आहे, महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे आणि विलासराव देशमुखांपर्यंतची एक चांगली परंपरा आहे. आपली वैचारिक लढाई निवडणुकीत असते. एरव्ही महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र येतो.”
देशात आणि राज्यात मोठी उलथापालथ होणार : संजय राऊतांचा दावा
केंद्रात आगामी दिवसांमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी यापूर्वी केला होता. आज त्यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य करताना मोठं व्यक्त केले आहे. संजय राऊत म्हणाले “एप्रिल-मे महिन्यात देशात आणि राज्यात मोठी उलथापालथ होणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिल्लीत घडामोडी घडल्यावर त्याचं प्रतिबिंब महाराष्ट्रात पडेल. इतर राज्यांवरही पडेल.”
Anant Singh: अनंत सिंह यांना मोठा झटका ; आता तुरुंगात जावे लागणार!





