‘या’ देशातील नागरिकांचे आयुर्मान जास्त ; नागरिक सरासरी ८७.०१ वर्षे जगतात

Monaco Country । जागतिक आरोग्य संघटना अर्थात पुढच्या सांगण्यानुसार सध्या जगभरातच माणसाचे आयुर्मान वाढत असल्याची चिन्हे दिसत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या अहवालानुसार 2000 ते 2019 या कालावधीत पृथ्वीवरील माणसाच्या आर्युमानामध्ये जवळपास सहा वर्षांनी वाढ झालेली आहे. 2000 साली पृथ्वीवरील माणूस सरासरी 66.8 वर्षे जगत होता. 2019 मध्ये त्यामध्ये वाढ होऊन माणसाचे सरासरी आयुर्मान 73.4 वर्षांवर आलेले आहे. अर्थात याबाबत अनेक देशांमध्ये तीव्र मतभेद आहेत. अनेक देशांचे असे म्हणणे आहे की त्यांच्या देशातील माणसांचे सरासरी आयुर्मान जास्त आहे. मग प्रश्न असा पडू शकतो की सर्वात कमी आयुर्मान कोणत्या देशातील नागरिकांचे आहे?
संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या स्त्री आणि पुरुषांच्या एकत्रित आकडेवारीनुसार 2023 मध्ये मोनॅको या देशातील नागरिकांचे आयुर्मान सर्वाधिक असल्याचे दिसून आलेले आहे या देशातील नागरिक सरासरी 87.0१ वर्षे जगतात. त्या अर्थाने आर्युमानाबाबत मोनॅको हा देश क्रमांक एक वर आहे. हाँगकाँग मधील नागरिकांचे सरासरी आयुर्मान 85.83 वर्षे एवढे आहे. चीनच्या तुलनेत हे आयुर्मान कितीतरी वर्षे जास्त आहे. चीनच्या प्रभाव क्षेत्रात असणाऱ्या मकाऊ या देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान 85.151 वर्षे आहे.
आशियातील जपान हा देश लोकसंख्येची जास्त घनता असणारा देश म्हणून ओळखला जातो. 2023 मध्ये या देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान हे 84.95 वर्षे होते. लिशेस्टाईन या छोट्याशा सरंजामे देशांमध्ये नागरिकांचे सरासरी आयुर्मान हे 84.77 वर्षे आहे. हा देश आल्प्सच्या पर्वतरांगांमध्ये स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्ये वसलेला आहे. स्विझर्लंड मधील नागरिकांचे सरासरी आयुर्मान 84.38 वर्षे आहे.
वेगाने आर्थिक प्रगती करणाऱ्या सिंगापूर मधील नागरिकांचे सरासरी आयुर्मान 84.27 वर्षे आहे. इटलीतील नागरिकांचे सरासरी आयुर्मान 84.20 वर्षे एवढे आहे. त्या ठिकाणचे हवामान आणि जीवनशैलीचा दर्जा त्यामुळे एवढे दीर्घायुष्य लाभत असल्याचे तज्ञांचे मत आहे.
दक्षिण कोरियातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान 2023 मध्ये 84.14 वर्षे इतके होते. स्पेन मधील नागरिकांचे सरासरी आयुर्मान हे 84.05 वर्षे इतके आहे. इटली प्रमाणेच भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील या देशातील नागरिकांना इटलीप्रमाणेच आरोग्यदायी हवामान लाभत असल्याने त्यांचे आयुर्मान जास्त आहे. सरासरी आयुर्मानाच्या मानांकन यादीत फ्रान्स विसाव्या स्थानावर येतो. त्या देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान 83.35 वर्षे एवढे आहे. उत्तर अमेरिकेतील आणि युरोपातील अनेक देशांपेक्षा हे प्रमाण जास्त आहे.
आता आपण माणसाचे आयुर्मान कमी असलेल्या देशांचा विचार केला तर, 2023 मध्ये आफ्रिका खंडातील चाड या देशातील आयुर्मान केवळ 53.68 वर्षे आहे. आफ्रिका खंडातीलच नायजेरिया मधील नागरिकांचे सरासरी आयुर्मान 53.87 वर्षे आहे. आफ्रिका खंडाच्या मध्यभागी असलेल्या लेसोथो या देशातील सरासरी आयुर्मान हे 54.91 वर्षे आहे. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक या देशातील सरासरी आयुर्मान 55.48 वर्षे आहे. दक्षिण सुदान मधील नागरिकांचे सरासरी आयुर्मान 56.51 वर्षे आहे. सोमालिया या देशाला गेली अनेक वर्षे सशस्त्र संघर्ष आणि सातत्याने अन्नधान्याची टंचाई अशा समस्यांनी वेढलेले आहे. त्यामुळे या देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान 57.35 वर्षे आहे.
दक्षिण आफ्रिका आणि मोझांबिक या देशांच्या मध्ये वसलेल्या ईस्वातीनी या देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान 57.71 वर्षे आहे. नामिबियातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान 59.53 वर्षे आहे. आफ्रिकेच्या पश्चिमेला असलेल्या गिनीया या देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान 59.55 वर्षे आहे. माली या देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान 60.03 वर्षे आहे.





