India-Pakistan Tensions : भारत-पाकिस्तान वाढत्या तणावामुळे टेरिटोरियल आर्मीही सज्ज; धोनीलाही तयार राहावे लागणार?

MS Dhoni and Territorial Army Role Amid India-Pakistan Tensions : गेल्या एका आठवड्यात भारत आणि पाकिस्तानमधील तणाव खूप वाढला आहे. ८ मे रोजी पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, लष्करप्रमुखांना देशातील टेरिटोरियल आर्मीला (प्रादेशिक सेना) बोलावण्याचा अधिकारही मिळाला आहे. अशा परिस्थितीत, एमएस धोनी देखील प्रादेशिक सैन्याचा एक भाग आहे. त्यालाही सज्ज राहावे लागेल का? जाणून घेऊया.
एमएस धोनीला तयार राहावे लागेल का?
जर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव अजून वाढला तर प्रादेशिक सैन्यही जबाबदारी घेईल. अशा परिस्थितीत, एमएस धोनी देखील प्रादेशिक सैन्याचा एक भाग आहे. त्यांच्याकडे लेफ्टनंट कर्नलचा दर्जा आहे. धोनीने टेरिटोरियल आर्मीकडून प्रशिक्षणही घेतले आहे. अनेक वेळा तो आर्मी कॅम्पमध्ये वेळ घालवताना दिसला आहे. याशिवाय सचिन तेंडुलकर हा भारतीय हवाई दलात कॅप्टन देखील आहे. जर परिस्थिती आणखी बिकट झाली तर धोनीही जबाबदारी घेऊ शकतो, असे मानले जाते.
In exercise of the powers conferred by Rule 33 of the Territorial Army Rule 1948, the Central Government empowers Chief of the Army Staff to exercise the powers under that rule to call out every officer and every enrolled person of the Territorial Army to… pic.twitter.com/zgKIPHYtY7
— All India Radio News (@airnewsalerts) May 9, 2025
तणाव लक्षात घेता, बीसीसीआयने आयपीएल २०२५ स्पर्धा पुढील एका आठवड्यासाठी पुढे ढकलली आहे. धोनी यापूर्वी सीएसकेचे नेतृत्व करत होता. पण, त्याच्या संघ प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत, सर्व खेळाडू हळूहळू आपापल्या घरी परतत आहेत. आता बातमी आली आहे की भारत सरकारनेही प्रादेशिक सैन्याला या संपूर्ण प्रकरणाला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.
टेरिटोरियल आर्मी म्हणजे काय?
Dhoni🤝Indian Army 🇮🇳❤
Indian Army Lieutenant Colonel Mahendra Singh Dhoni using Tavor assault Gun at Para Special Forces training Camp. MSD is holding this rank in Army since 2011.
Dhoni once said that still am Playing Cricket but Indian Army was always my 1st Choice. pic.twitter.com/Jpx2VQEVfm
— Vivek Singh (@VivekSi85847001) June 22, 2023
टेरिटोरियल आर्मी देखील भारतीय सैन्याचा एक भाग आहे. ही टेरिटोरियल आर्मी (प्रादेशिक सेना) थेट मोर्चा हाताळत नाही. पण जर देशात युद्ध परिस्थिती असेल तर संरक्षण विभाग टेरिटोरियल आर्मीचा वापर करु करतो. प्रादेशिक सैन्याला आवश्यकतेनुसार नियंत्रित सैन्याला युनिट्स देखील पुरवावे लागतात. कोणत्याही देशाशी युद्ध झाल्यास, प्रादेशिक सैन्याचा वापर करता यावा म्हणून, प्रादेशिक सैन्याला लष्कराकडून प्रशिक्षण देखील दिले जाते. संकटाच्या काळात, या सैन्याचे काम देशाला सुरक्षा प्रदान करणे देखील आहे. टेरिटोरियल आर्मी ही एक स्वयंसेवी संघटना आहे.





