Virat Kohli Post : ‘आम्ही तुमच्या पाठिशी एकजुटीने उभे आहोत…’, विराटने सैनिकांसाठी केलेल्या पोस्टने जिंकली मनं

Virat Kohli share Instagram post and supports Indian Armed Forces : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावादरम्यान, भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने भारतीय सशस्त्र दलांना पाठिंबा देण्याचा जोरदार संदेश दिला आहे. क्षेपणास्त्र हल्ले, हवाई हल्ल्यांचे इशारे आणि सीमेवर वाढलेल्या लष्करी हालचालींमुळे सुरक्षेच्या चिंता वाढल्या आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम आयपीएल २०२५ वरही झाला. त्यामुळे बीसीसीआयने शुक्रवारी आयपीएल २०२५ उर्वरित हंगाम एका आठवड्यासाठी पुढे ढकलला आहे.
विराटच्या पोस्टने जिंकली सर्वांची मनं –
विराट कोहलीने भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ एक इंस्टा पोस्ट पोस्ट केली आहे. विराट कोहलीने एका इंस्टा पोस्टमध्ये लिहिले की, ‘या कठीण काळात आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या आपल्या सशस्त्र दलांसोबत आम्ही एकजुटीने उभे आहोत. आपल्या वीरांच्या अटल शौर्याचे आणि त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या महान राष्ट्रासाठी दिलेल्या त्यागाचे आपण सदैव ऋणी राहू.’ विराटच्या या पोस्टने सर्वांची मनं जिंकली.
🇮🇳#ViratKohli pic.twitter.com/2rmN19YfsY
— Circle of Cricket (@circleofcricket) May 9, 2025
आयपीएल २०२५ मधील १६ सामने अजून बाकी –
भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट, पंजाब आणि राजस्थानमधील अनेक शहरांवर हल्ला केला आहे. पण, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानचे हल्ले पूर्णपणे हाणून पाडले. यानंतर कोहलीची ही पोस्ट आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएल २०२५ स्पर्धा देखील एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहे. या सर्धेतील अजून १६ सामने बाकी असून सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.
हेही वाचा – Ambati Rayudu Troll : अंबाती रायुडू वादग्रस्त पोस्टमुळे होतोय ट्रोल, काय केली होती पोस्ट? जाणून घ्या
बीसीसीआय सरकारी अधिकाऱ्यांशी बोलत आहे. अजूनही बरेच लीग सामने आणि नॉकआउट सामने बाकी आहेत. आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आल्यामुळे, उर्वरित सामने पुन्हा वेळापत्रकबद्ध केले जातील की सुरक्षित ठिकाणी खेळवले जातील असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परिस्थिती सुधारल्यावरच हे सर्व कळेल.





