LIC ची खास योजना: दररोज 160 रूपये वाचवून व्हा 23 लाखाचे मालक

नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी विमा कंपनीमध्ये (भारतीय जीवन विमा महामंडळ) गुंतवणूकीसाठी अनेक योजना आहेत. या योजनेत गुंतवणूक करून ग्राहक आपल्या भवितव्यासाठी खुप पैसे जमवू शकतात. एलआयसी अशा बर्याच पॉलिसी ऑफर करते ज्या बहुतेक लोकांना आवडतात. काही पॉलिसी या दीर्घ मुदतीच्या तर काही अल्प मुदतीच्या असतात. एलआयसीने ‘न्यू मनी बॅक पाॅलिसी’ ही एक नवीन योजना लाॅंच केलीय. यात गुंतवणूक करून तुम्हा चांगला परतावा मिळवू शकता.
काय आहे एलआयसी न्यू मनी बॅक पॉलिसी?
एलआयसीची ही मनी बॅक प्लॅन नॉन-लिंक्ड लाइफ इन्शुरन्स पॉलिसी आहे. खात्रीपूर्वक रिटर्न आणि बोनस मिळतो. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे विमाधारकाला 5 वर्षात पैसे परत मिळतात, चांगला परतावा, कर विम्याचा लाभ मिळतो.
मॅच्योरिटीवर मिळणारी रक्कम करमुक्त आहे –
आपल्याला ही योजना घेण्यासाठी 20 वर्ष आणि 25 वर्षांचे 2 पर्याय मिळतील. ही पाॅलिसी कर मुक्त आहे. यासह, त्याच्या व्याज, प्रीमियम पेमेंट आणि मॅच्युरिटीवर प्राप्त झालेल्या रकमेवर कोणताही कर आकारला जाणार नाही. या योजनेत जर तुम्ही 25 वर्षांपर्यंत दररोज 160 रुपये गुंतवत असाल तर 25 वर्षांनंतर तुम्हाला 23 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळतील.
13 ते 50 वर्षे वयोगटातील लोक घेऊ शकतात लाभ –
एलआयसीच्या मते, 13 वर्षे ते 50 वर्षांपर्यंतची कोणतीही व्यक्ती ही योजना घेऊ शकते. या योजनेत, दर पाचव्या वर्षी म्हणजेच 5 व्या वर्षी, 10 व्या वर्षी, 15 व्या वर्षी, 20 व्या वर्षी, 15% पैसे परत मिळतील. परंतु हे तेव्हाच होईल जेव्हा प्रीमियमच्या किमान 10 टक्के रक्कम जमा केली जाईल. तसेच गुंतवणूकदारांना मॅच्युरिटीवर बोनस दिला जाईल. मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदारांना बोनसही दिला जाईल.




