LIC लवकरच आरोग्य विमा क्षेत्रात प्रवेश करणार

मुंबई – लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन म्हणजे एलआयसी 31 मार्च पूर्वी आरोग्य विमा क्षेत्रातील कंपनीचे भाग भांडवल निश्चितपणे खरेदी करणार आहे. आम्ही आरोग्य विमा कत्रात प्रवेश करणार आहोत असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितले.
संबंधित खासगी आरोग्य विमा क्षेत्रातील कंपनीचे 51% पेक्षा जास्त भाग भांडवल एलआयसी खरेदी करणार नाही.
किती भाग भांडवल खरेदी करायचे हे एलआयसीचे संचालक मंडळ ठरविणार आहे. सध्याच्या नियमानुसार जीवन विमा कंपन्यांना आरोग्य विमा क्षेत्रात काम करता येत नाही. यासाठी संयुक्त लायसनची गरज असते. याबाबत अर्थसंकल्पात भाष्य अपेक्षित होते. तसे काही झाले नाही.
काही माध्यमातून वृत्तानुसार एलआयसी मणिपल सिग्ना कंपनीतील भाग भांडवल 4,000 कोटी रुपये देऊन खरेदी करणार आहे. दरम्यान मोहंतीच यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसापासून जीवन विमा क्षेत्रात काही प्रमाणात मंदी निर्माण झाल्यासारखे परिस्थिती निर्माण झाली आहे.
तिसर्या तिमाहीत एलआयसीचे प्रीमियम संकलन 9 टक्क्यांनी कमी होऊन 1.06 लाख कोटी रुपये झाले. मात्र नफा सतरा टक्क्यांनी वाढून 11,056 कोटी रुपये झाला होता. भारतात फक्त 3.7 टक्के लोकांनी जीवन विमा घेतलेला आहे तर जागतिक पातळीवर हे प्रमाण 7% आहे. यामुळे या क्षेत्रात वाढीसारखी वाव आहे.




