IDBI बँकेचं खासगीकरण अंतिम टप्प्यात! सरकार आणि LIC विकणार मोठं भागभांडवल – जाणून घ्या काय होणार
Updated On:

नवी दिल्ली – आयडीबीआय बँकेतील बरेच भागभांडवल केंद्र सरकार आणि एलआयसी विकणार आहे. यासाठीच्या बोली तिसर्या तिमाहीत जारी करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन व गुंतवणूक विभागाचे सचिव अरुणीश चावला यांनी दिली.
बोली यशस्वी झालेल्या संस्थांची नावे मार्च 2026 च्या दरम्यान जाहीर करण्यात येतील. गेल्या तीन वर्षापासून आयडीबीआय बँकेचे खासगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत या प्रक्रियेत कसलेही अडथळे आले नसल्याचे त्यांनी सांगितले. शक्य बोली लावणार्यांना या बँकेच्या ताळेबंदाची सविस्तर माहिती उपलब्ध करण्याची यंत्रणा लवकरच सुरू होणार आहे. त्या आधारावर बोलीदार बोली बोलू शकतील असे समजले जाते.





