Manjari Khurd News : मांजरी खुर्द-कोलवडी परिसरात ऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची ३ नवजात पिल्ले; वन विभागाकडून हाय-अलर्ट
Manjari Khurd News : मांजरी खुर्द - कोलवडी शिवरस्त्यावर एका ऊसाच्या शेतात बिबट्याची तीन अतिशय लहान (नवजात) पिल्ले आढळून आल्याने परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे.

Manjari Khurd News : मांजरी खुर्द-कोलवडी (ता. हवेली) शिवरस्त्यालगत मौजे कोलवडी हद्दीतील ऊसाच्या शेतात बिबट्याची तीन नवजात पिल्ले आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ऊसतोड सुरू असताना सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास मजुरांना ही पिल्ले दिसून आली. (Manjari Khurd News)
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात सतर्कता वाढविण्यात आली आहे. मांजरी खुर्द येथील शेतकरी उत्तम सोपान उंद्रे यांच्या कोलवडी हद्दीतील शेतात ऊसतोडीचे काम सुरू होते. (Manjari Khurd News
यावेळी ऊसतोड मजुरांना ऊसामध्ये बिबट्याची तीन नवजात पिल्ले आढळली. त्यांनी तातडीने शेतमालक उत्तम उंद्रे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर उंद्रे यांनी वन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती कळविली. (Manjari Khurd News)
माहिती मिळताच वन कर्मचारी ज्ञानेश्वर शिवले घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. दरम्यान, परिसरात नर व मादी बिबट्याचाही वावर असल्याचे बाळासाहेब जाधव व आशिष उंद्रे यांनी सांगितले. (Manjari Khurd News)
बिबट्याची पिल्ले आढळल्याने शेतकरी, ऊसतोड मजूर आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मांजरी खुर्दच्या पोलीस पाटील भारती उंद्रे आणि कोलवडीच्या पोलीस पाटील मिना गायकवाड यांनी केली आहे. (Manjari Khurd News)
वन विभागाकडून परिसरावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. बिबट्या किंवा त्याची पिल्ले आढळल्यास त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न न करता त्वरित वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे. (Manjari Khurd News)






