Brett Lee Sooryavanshi : “त्याने जर मला सिक्स मारला तर मी…”, वैभव सूर्यवंशीबद्दल ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू ब्रेट लीच मोठं वक्तव्य
Brett Lee Sooryavanshi : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने वैभव सूर्यवंशीच्या खेळाचे कौतुक करतानाच एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Brett Lee On Vaibhav Sooryavanshi Age Controversy YouTube Interview : आयपीएल २०२६ मध्ये जसप्रीत बुमराह आणि जोश हेझलवूडसारख्या जगातील धाकड गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या १५ वर्षीय भारतीय सलामीवीर वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) याची सध्या क्रिकेट जगतात मोठी चर्चा सुरू आहे. आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली (Brett Lee) याने वैभव सूर्यवंशीच्या खेळाचे कौतुक करतानाच, त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करण्याची आपली खास रणनीती उघड केली आहे.
“त्याने सिक्स मारला तरी मी पुन्हा बाउन्सरच टाकेन!”
‘बिअर बायसेप्स’ (BeerBiceps) या यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत बोलताना ४९ वर्षीय ब्रेट ली म्हणाला, “जर मला वैभव सूर्यवंशीविरुद्ध गोलंदाजी करण्याची संधी मिळाली असती, तर मी त्याच्या क्षमतेची परीक्षा घेण्यासाठी शॉर्ट-पिच चेंडूंचा (Short Pitch Bowling) मारा केला असता. मला फलंदाजाने हुक किंवा पुल शॉट मारलेला आवडतो, कारण त्यामुळे सामना बरोबरीचा होतो. मी त्याच्या हेलमेटच्या जवळ चेंडू टाकून तो काय करतो हे पाहिले असते. कदाचित त्याने माझ्या चेंडूवर षटकारही मारला असता, तरीही मी पुन्हा तसाच बाउन्सर टाकण्यापासून मागे हटलो नसतो.”
वैभवच्या ‘वय वादावर’ ब्रेट लीचे सडेतोड उत्तर!
🏏🔥 BRETT LEE ON HOW HE WOULD BOWL TO VAIBHAV SOORYAVANSHI
Brett Lee said he would test Vaibhav Sooryavanshi with a short ball, targeting his helmet badge and challenging him to hook or pull it.
Lee added that even if the youngster smashed him for six, he would come back with… pic.twitter.com/D29mheyiTs
— GFN (@GFNIND) August 8, 2026
सध्या क्रिकेट जगतात वैभव सूर्यवंशीच्या वयावरून (Age Controversy) मोठी चर्चा सुरू आहे. यावर आपले मत मांडताना २०१५ मध्ये क्रिकेटला अलविदा म्हणणारा ब्रेट ली म्हणाला, “तो एक अप्रतिम खेळाडू आहे. भारताबाहेर प्रत्येक जण हाच प्रश्न विचारत आहे की तो खरोखरच १५ वर्षांचा आहे का? मला त्याच्या वयाशी काहीही देणेघेणे नाही. तो १५ वर्षांचा असेल तर उत्तमच आहे, पण तो १७ किंवा १८ वर्षांचा असला तरी कोणाला काय फरक पडतो? महत्त्वाचे म्हणजे या मुलाला क्रिकेट खेळता येते. तो भारतीय क्रिकेटसाठी एक मोठा शोध आहे आणि भविष्यात तो नक्कीच उत्तुंग यश संपादन करेल.”
गेल्या महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणात तो फ्लॉप ठरला असला, तरी त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर ३ सामन्यांत १५१ धावा कुटून त्याने ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा (Player of the Series) मान पटकावला होती.





