Dharmendra Passes Away : ‘माझे १० किलो रक्त कमी झाले…’, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट

Dharmendra passes away cricketers pay emotional tributes : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात आणि विशेषतः चित्रपटसृष्टीत मोठी शोककळा पसरली आहे. भारतीय क्रिकेट जगतानेही या महान कलाकाराच्या जाण्यावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांसारख्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
क्रिकेटपटूंनी व्यक्त केले दुःख –
धर्मेंद्र यांनी अनेक दशके आपल्या अभिनयाने भारतीय सिनेमावर अधिराज्य गाजवले आणि एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. वीरेंद्र सेहवागने ‘एक्स’वर धर्मेंद्र यांना आदरांजली वाहताना लिहिले, “धर्मेंद्र जी फक्त अभिनेते नव्हते, ते एक युग होते! साधेपणातले सुपरस्टार, ताकदीमध्ये ‘ही-मॅन’ आणि सोन्याचे हृदय असलेले व्यक्ती. त्यांचे चित्रपट, त्यांची शैली आणि त्यांचा ओलावा पिढ्यानपिढ्या आठवणीत राहील. एका महान कलाकाराला शांती मिळो. ॐ शांती.”
धर्मेन्द्र जी सिर्फ अभिनेता नहीं थे, एक युग थे।
सादगी में सितारा, ताकत में ही-मैन और दिल में सोना।
उनकी फ़िल्में, उनका अंदाज़ और उनकी गर्मजोशी
पीढ़ियों तक याद रखी जाएगी।
एक महान कलाकार,
ईश्वर उनकी आत्मा को शांति दे। ॐ शांति #Dharmendra pic.twitter.com/fzaBN6kFrP— Virrender Sehwag (@virendersehwag) November 24, 2025
नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपले दुःख व्यक्त करताना म्हटले: “मी आजवर पाहिलेल्या कलाकारांमध्ये सर्वात देखणा अभिनेता, सोन्याचे हृदय असलेले… ‘शोले’ कदाचित आतापर्यंतचा सर्वात महान हिंदी चित्रपट असेल… माझ्यासाठी ते वडिलांसारखे होते आणि कायम एक लेजेंड राहतील. त्यांच्या कुटुंबाला हे कधीही न भरून येणारे नुकसान सहन करण्याची शक्ती मिळो.”
हेही वाचा – IND vs SA : यशस्वी जैस्वालचा मोठा पराक्रम! सचिननंतर २१ व्या शतकात ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
विराट कोहली आणि मोहम्मद कैफ यांच्या भावना –
Today, we have lost a legend of Indian cinema who captivated hearts with his charm and his talent. A true icon who inspired everyone who watched him. May the family find strength in this tough time. My sincere condolences to the whole family. 🙏🙏
— Virat Kohli (@imVkohli) November 24, 2025
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शोक व्यक्त करताना म्हटले, “आज आम्ही भारतीय सिनेमातील एका लेजेंडला गमावले, ज्यांनी आपल्या मोहकतेने आणि प्रतिभेने मने जिंकली होती. ते एक सच्चे आयकॉन होते, ज्यांनी त्यांना पाहणाऱ्या प्रत्येकाला प्रेरित केले. या कठीण काळात कुटुंबाला देव शक्ती देवो. संपूर्ण कुटुंबासोबत माझ्या तीव्र संवेदना आहेत.”
सचिन तेंडुलकरने धर्मेंद्र यांच्या निधनानंतर एक अतिशय भावूक पोस्ट शेअर केली. तो म्हणाला, “माझ्यासह अनेक लोकांना धर्मेंद्र जी लगेच आवडले. ते अभिनेते, ज्यांनी आपल्या अष्टपैलुत्वाने आमचे मनोरंजन केले. जेव्हा मी त्यांना भेटलो, तेव्हा पडद्यावरील ते आपलेपणाचे नाते ऑफ-स्क्रीन अधिक मजबूत झाले. त्यांच्यात खूप ऊर्जा होती आणि ते नेहमी म्हणायचे तुला पाहून माझे एक किलो रक्त वाढते.”
माझे १० किलो रक्त कमी झाले आहे – सचिन तेंडुलकर
I, like many others, took an instant liking to Dharmendra ji, the actor, who entertained us with his versatility. That on-screen bond became stronger off-screen when I met him.
His energy was incredibly infectious, and he would always tell me, “Tumko dekhkar ek kilo khoon badh… pic.twitter.com/A8CmgR9WkW
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 24, 2025
सचिन पुढे म्हणाला, “त्यांच्यात एक सहज आपुलकी होती, ज्यामुळे त्यांच्या आसपासच्या प्रत्येकाला मौल्यवान आणि खास वाटायचे. ते जसे व्यक्ती होते, त्यांचा चाहता नसणे अशक्य होते. आज, त्यांच्या जाण्याने माझे हृदय जड झाले आहे. जसे माझे १० किलो रक्त कमी झाले आहे.” अशा शब्दांत सचिनने आपल्या भावना व्यक्त केल्या.





