इस्रायलच्या हल्ल्यात लेबेनानमधील मृतांची संख्या ५५८ वर पोहोचली

बैरुत (लेबेनान) – लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यातील मृतांची संख्या ५५८ वर पोहोचली आहे. लेबनीज आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार कालपासून सुरू झालेल्या हल्ल्यात १,८३५ लोक जखमी झाले आहेत. इस्रायल आणि हिज्बुल्लाह दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर जोरदार रॉकेट हल्ले सुरू आहेत.
इस्त्रायली लष्कराने आज लेबनॉनमध्ये आजही आक्रमक कारवाईला गती दिली असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे दुसरीकडे, हिजबुल्लाहने हैफाच्या दक्षिणेकडील इस्रायलच्या इल्याकिम लष्करी तळावर फादी – २ क्षेपणास्त्रांचा मारा केला, असे आज एका निवेदनात म्हटले आहे.
नव्याने वाढू लागलेला हा संघर्ष त्वरित थांबवण्याचे आवाहन जागतिक पातळीवरील नेत्यांनी दोन्ही बाजूंना केले आहे. गाझामधील युद्धबंदी कराराची अंमलबजावणी घडवून आणण्यास आपली कटिबद्धता असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
तसेच इस्रायल आणि लेबेनॉनदरम्यानच्या सीमेवरील संघर्ष रोखण्याचाही प्रयत्न केला जात असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. इस्रायल-लेबेनॉन दरम्यानच्या संघर्षाबाबत संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऍन्टोनिओ गुटेरेस यांनीही चिंता व्यक्त केली आहे.





