Crime News: दरवाजा राहीला अर्धवट उघडा, चोरट्याने मारला साडेतीन तोळे वजनाच्या दागिन्यावर डल्ला

शिरूर – शिरूर तालुक्यातील शिरसगावकाटा येथील सुभाष भिकोबा कदम या व्यक्तीला रात्रीच्या वेळी दरवाजा अर्धवट उघडा ठेवले चांगलेच महागात पडले असून अज्ञात चोरटयाने घरात प्रवेश करून घरामध्ये देव्हाऱ्याच्या खाली असलेल्या लाकडी कप्यात ठेवलेले साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे १ लाख ,७८ हजार रूपये किमंतीचे दागिने चोरुन नेले आहे.
याबाबत शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष भिकोबा कदम (वय ७० वर्षे ) यांच्या घरी दि. ०८ ऑगष्ट रोजी रात्री १२.००ते दि ०९ ऑगष्ट रोजी पहाटे ०५.०० वा. च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचा अर्धवट उघडा असलेल्या दरवाज्यामधून प्रवेश करून घरामध्ये देव्हाऱ्याच्या खाली असलेल्या लाकडी कप्यात ठेवलेला एकूण १,७८,००० रूपये किंमतीचा ऐवज त्यामध्ये ९५ हजार रु किंमतीचे १९ ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण १५ हजार रु किंमतीचे ३ ग्रॅमचे गळयातील डोर्ले ५ ग्रॅम वजणाची पिळयाची २५ हजार रु किंमतीची अंगठी,
१५ हजार रु किंमतीची ३ ग्रॅम वजना ची लेडीज अंगठी, १५ हजार रु किंमतीचे ३ ग्रॅम गळयातील मणी , साडेसात हजार रु किंमतीचे दीड ग्रॅम गळयातील डोर्ले , अडीच हजार रु किमंतीची अर्धा ग्रॅम नाकातील चमकी, ३ हजार रु . किमंतीचा चांदीचा पायातील जोडवी जोड असा ऐवज चोरट्याने चोरुन नेला आहे . या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिंदे करीत आहेत .





