कॉँग्रेसचा ‘हात’ सोडत संग्राम थोपटेंच्या हाती ‘कमळ’; भाजपात जाहीर प्रवेश

मुंबई : काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सभासदत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भोरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली होती. ज्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते.
त्यानुसार आज संग्राम थोपटे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात संग्राम थोपटे यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे.
तर दुसरीकडे संग्राम थोपटे यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक भाजप नेत्यांनी विरोध केला आहे. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना एक पात्र लिहिले आहे. घरात बाहेरचे पाहुणे जास्त झाले की घरातील लोकांना बाहेर झोपावे लागते, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करणारे पत्र लिहिले आहे.





