पुणे,: पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) या मुख्य जलवाहिनीत गळती झाल्यामुळे एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) करिता होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. गळती दुरुस्तीसाठी काही वेळ लागणार असल्याने रविवार, २० जुलै २०२५ रोजी एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.), एस.एन.डी.टी. (एच.एल.आर.) व चतु:श्रृंगी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत होणार आहे. या भागात होणार परिणाम एस.एन.डी.टी. (एच.एल.आर.) क्षेत्र: गोखले नगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हिन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बँक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडियल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदूवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी आदी. एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) क्षेत्र: लॉ कॉलेज रोड, पौड रोड, शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसायटी, भीमनगर, वेदांत नगरी, कुलश्री कॉलनी, सहवास, क्षिप्रा, मनमोहन सोसायटी, विठ्ठल मंदिर परिसर, गोसावी वस्ती, करिश्मा सोसायटी, बंधन सोसायटी परिसर, मयूर कॉलनी, कर्वे रोड झाला सोसायटी ते छत्रपती शिवाजी पुतळा परिसर, एरंडवणा परिसर, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पूल परिसर, एच.ए. कॉलनी, भरत कुंज, स्वप्नमंदिर परिसर, पटवर्धन बाग, करिश्मा सोसायटी ते वारजे वॉर्ड ऑफिस, गरीजा शंकर सोसायटी आदी. चतु:श्रृंगी टाकी क्षेत्र: औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, डॉ. आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळ नगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल सोसायटी, सिंध सोसायटी, औंध गाव.