Nasrapur case : “न्याय मिळत नाही तोपर्यंत नेतेमंडळींनी भेटायला येऊ नये”; नसरापूर प्रकरणातील चिमुकलीच्या वडिलांचे आवाहन
Nasrapur case : विविध पक्षाचे नेते नसरापूरला जात पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत

Nasrapur case : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ६५ वर्षीय नराधमाने चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नसरापूरच्या गावकऱ्यांकडून आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा द्यावी किंवा आरोपीला गावकऱ्यांच्या हाती सोपवावं, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर विविध पक्षाचे नेते नसरापूरला जात पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत. पण पीडितेच्या वडिलांनी, न्याय मिळत नाही तोपर्यंत नेतेमंडळींनी भेटायला येऊ नये, असं आवाहन केलं आहे. नेतेमंडळींनी आम्हाला भेटायला येऊ नये, अशी विनंती नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांनी व्हिडिओद्वारे केली आहे.
पीडितेचे वडील काय म्हणाले?
“नमस्कार! मी पीडित मुलीचा वडील. आता मी आस्थी विसर्जनासाठी देहू इथे आलो असताना, माझ्या घरच्यांकडून मला फोन आला की, तिथे बरेच राजकारणी लोकं सांत्वन करण्यासाठी किंवा भेटायला येत आहे. माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे. जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी मिळत नाही, तोपर्यंत एकाही राजकारण्याने आमच्या घरी भेटायला येऊ नये.
Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषद निवडणूक बिनविरोध! उद्या होणार अधिकृत घोषणा
एवढी माझी नम्र विनंती आहे. जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कुणी लोकं आहेत, त्यांना आम्हाला भेटायचं असेल तेव्हा भेटू. जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कोणत्याही नराधमाने माझ्या सांत्वनासाठी येऊ नये, ही माझी नम्र विनंती आहे”, असं पीडितेचे वडील म्हणाले आहेत.
नेमकी घटना काय?
पीडित चिमुकली ही सुट्ट्या घालवण्यासाठी नसरापूर येथील आपल्या आजी-आजोबांकडे आली होती. दुपारी ती घरासमोर खेळत असताना, गावातीलच ६५ वर्षीय आरोपी भीमा कांबळे याने तिला फूस लावून गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने चिमुकलीची दगडाने ठेचून हत्या केली आणि तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. Nasrapur case
CCTV मुळे नराधमाचा चेहरा समोर
मुलगी बराच वेळ न दिसल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. सायंकाळच्या सुमारास गोठ्यात तिचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली. गावकऱ्यांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले असता, आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना स्पष्टपणे दिसला. या तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी भीमा कांबळे याला तातडीने ताब्यात घेतले असून 7 मेपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. Nasrapur case
हेही वाचा:
Sanjay Raut : नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी; संजय राऊत म्हणाले…






