Pinky Singh Win : क्रिकेट कोच ते लॉन बॉल्स चॅम्पियन! खाजगी आयुष्यातील वादळावर मात करत पिंकी सिंहचा ग्लास्गो राष्ट्रकुलमध्ये डंका
Pinky Singh Win : . महिलांच्या दुहेरी (Section B) दुसऱ्या सामन्यात भारताच्या रूपा राणी तिर्की आणि पिंकी सिंह या जोडीने दक्षिण आफ्रिकेचा २-० (६-४, ७-५) असा पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला

Pinky Singh Rupa Rani Tirkey Lawn Bowls Glasgow Commonwealth Games 2026 Win : स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2026) भारतीय लॉन बॉल्स (Lawn Bowls) संघाने विजयाची मालिका कायम ठेवली आहे. महिलांच्या दुहेरी (Section B) तिसऱ्या सामन्यात भारताच्या रूपा राणी तिर्की आणि पिंकी सिंह या जोडीने टोंगाच्या जोडीचा ५-२, ४-६, १-० ने पराभव करत सलग तिसरा सामना जिंकला. यापूर्वी भारतीय जोडीने माल्टा आणि दक्षिण आफ्रिकेच्याजोडीचा पराभव केला होता. या यशाच्या केंद्रस्थानी भारताची ४५ वर्षीय अनुभवी खेळाडू पिंकी सिंह (Pinky Singh) आहे.
क्रिकेट कोच ते लॉन बॉल्स चॅम्पियन! (Pinky Singh Win)
पिंकी सिंह ही २०२२ च्या बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक (Gold Medal) जिंकणाऱ्या भारतीय लॉन बॉल्स संघाची मुख्य खेळाडू होती. तिची क्रीडा कारकीर्द लॉन बॉल्सने नाही तर एका क्रिकेट प्रशिक्षकाने सुरू झाली होती. २००७ मध्ये दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये (DPS) क्रिकेट कोच म्हणून काम करत असताना तिला लॉन बॉल्सची आवड निर्माण झाली आणि तिने या खेळात देशाचे नाव उज्ज्वल केले.
Indian lawn bowler Pinky Singh thanked Prime Minister @narendramodi for creating a vibrant sporting ecosystem in India, saying it has provided athletes with the support and opportunities to grow and perform at the highest level.@IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/5kmSg1DfIh
— DD News (@DDNewslive) July 25, 2026
घटस्फोटाचे दुःखातही देशासाठी जिंकले ‘सुवर्ण’! (Pinky Singh Win)
Pinki Singh and Rupa Rani Tirkey hold their nerve in a tie-breaker again, to make it a hat-trick of wins for India, after beating Tonga in the women’s pairs event in Bowls at the Commonwealth Games. pic.twitter.com/VEVtwFmYpx
— ESPN India (@ESPNIndia) July 25, 2026
पिंकीचे वैयक्तिक आयुष्य अनेक संकटांनी भरलेले होते. २०१९ मध्ये विवाह झाल्यानंतर २०२० मध्ये त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि २०२१ मध्ये तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. कोविडच्या काळात कायदेशीर प्रक्रियेला उशीर झाल्यानंतर २०२२ मध्ये तिचा घटस्फोट झाला. मानसिक तणाव आणि वैयक्तिक आयुष्यातील पडझडीनंतरही पिंकीने बर्मिंघम २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. (Pinky Singh Win)
पिंकीने एशियन लॉन बॉल्स चॅम्पियनशिपमध्ये २०१७, २०२३ आणि २०२५ मध्ये तीन सुवर्णपदकेही जिंकली आहेत. आता ग्लास्गो २०२६ मध्येही तिच्याकडून सुवर्णकामगिरीची अपेक्षा आहे. (Pinky Singh Win)





