भारतीय कंपनीने 6 हजारात लाँच केला नवीन स्मार्टफोन, 6GB रॅम-5000mAh बॅटरीसह मिळतील अनेक फीचर्स

Lava Yuva Smart Launched: भारतीय स्मार्टफोन कंपनी Lava ने नवीन हँडसेट लाँच केला आहे. कंपनीने फक्त 6 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या Lava Yuva Smart स्मार्टफोनला बाजारात आणले आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी, 6 जीबीपर्यंत रॅमसह अनेक शानदार फीचर्स मिळतील. या फोनविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Lava Yuva Smart ची किंमत
Lava Yuva Smart ला ग्राहक फक्त 6 हजार रुपयात खरेदी करू शकतात. हा फोन Glossy Blue, Glossy White आणि Glossy Lavender रंगात येतो. या फोनच्या खरेदीवर होम सर्व्हिस आणि 1 वर्षाची वॉरंटी देखील मिळते.
Lava Yuva Smart चे स्पेसिफिकेशन्स
Lava Yuva Smart मध्ये 6.75-inch HD+ डिस्प्ले देण्यात आला असून, याचा आस्पेक्ट रेश्यो 20:9 आणि रिफ्रेश रेट्स 60Hz आहे. यामध्ये 5MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तर फोटोग्राफीसाठी रियरला ड्यूल कॅमेरा सेंसर मिळेल. यामध्ये एलईडी फ्लॅश लाइटसह 13 मेगापिक्सल + एआय कॅमेरा दिला आहे.
लावाचा फोन UNISOC 9863A चिपसेटसह येतो. यात 3 जीबी रॅम + 3 जीबी व्हर्च्युअल रॅम मिळेल. अशाप्रकारे ग्राहकांना एकूण 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मिळेल. फोन Android 14 Go Edition वर काम करतो.
Lava Yuva Smart मध्ये पॉवरबॅकअपसाठी 10W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली आहे. यामध्ये 3.5mm ऑडिओ, FM Radio दिले आहे. तसेच, हा फोन Dual4G VoLTE सपोर्टसह येतो.





