Laura Cardoso Record : ९ विकेट्स अन् ५ चेंडूत ५ बळी! ब्राझीलच्या २१ वर्षीय पोरीने क्रिकेट विश्वात मोठा धमाका; प्रतिस्पर्धी संघ १३ धावांत बाद
Laura Cardoso Record : बीसीए कालाहारी महिला टी-२०' स्पर्धेत एका महिला गोलंदाजाने चक्क ९ बळी घेत जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे.

Laura Cardoso 9 wickets T20I record : क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा अशक्य वाटणारे विक्रम प्रस्थापित होतात, पण ब्राझीलच्या एका २१ वर्षीय गोलंदाजाने जे करून दाखवले आहे, ते पाहून संपूर्ण क्रिकेट विश्व थक्क झाले आहे. ‘बीसीए कालाहारी महिला टी-२०’ स्पर्धेत एका महिला गोलंदाजाने चक्क ९ विकेट्स घेत जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे.
महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजवर कधीही न घडलेला चमत्कार ब्राझील आणि लेसोथो यांच्यातील सामन्यात पाहायला मिळाला. ब्राझीलची वेगवान गोलंदाज लॉरा कार्डोसो हिने लेसोथोच्या फलंदाजीचे अक्षरशः लचके तोडत एकाच डावात ९ विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम रचला. पुरुष असो वा महिला, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (T20I) असा पराक्रम करणारी लॉरा ही जगातील पहिलीच खेळाडू ठरली आहे.
५ चेंडूवर ५ विकेट्स आणि हॅट्ट्रिकचा थरार –
WORLD RECORD ALERT! 🚨🤯
Laura Cardoso scripts history for Brazil 🇧🇷 — a jaw-dropping 9-wicket haul (3-2-4-9) as Lesotho 🇱🇸 crumble for just 13 runs! 😳🔥
And that’s not all…
5 wickets in 5 balls — a T20I first EVER 💀🏏 pic.twitter.com/BnJ91ChLYG— CricketGully (@thecricketgully) April 9, 2026
ब्राझीलने प्रथम फलंदाजी करताना २०२ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरादाखल लेसोथोचा संघ फलंदाजीला आला तेव्हा लॉरा कार्डोसो नावाचे वादळ घोंघावले. तिने आपल्या स्पेलमध्ये केवळ ३ षटके टाकली आणि ९ फलंदाजांना तंबूत धाडले. विशेष म्हणजे, एका षटकाच्या शेवटच्या ३ चेंडूवर विकेट्स घेत तिने हॅट्ट्रिक पूर्ण केली आणि पुढच्या षटकाच्या पहिल्या २ चेंडूवरही विकेट्स घेत ‘५ चेंडूत ५ विकेट्स’ घेण्याचा दुर्मिळ पराक्रम केला.
मोडले दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड –
Brazil’s Laura Cardoso makes T20I history with nine-wicket haul against Lesotho
Read @ANI Story | https://t.co/rfDsRjwXFe#Brazil #LauraCardoso #Lesotho #T20ICricket pic.twitter.com/krkXPW8Ihp
— ANI Digital (@ani_digital) April 9, 2026
यापूर्वी पुरुष टी-२० मध्ये भूतानच्या सोनम येशेच्या नावावर ८ विकेट्सचा विक्रम होता, तर महिलांमध्ये इंडोनेशियाच्या रोहमालियाने ७ विकेट्स घेतल्या होत्या. लॉराने या दोन्ही विक्रमांना मागे टाकून ९ विकेट्सचा नवा विक्रम प्रस्थापित केला. लॉराच्या या भेदक माऱ्यामुळे लेसोथोचा संपूर्ण संघ अवघ्या १३ धावांत गारद झाला आणि ब्राझीलने हा सामना १८९ धावांनी खिशात घातला.
लॉरा कार्डोसोने वयाच्या १६ व्या वर्षीच हॅट्ट्रिक घेऊन आपली चमक दाखवली होती, पण आता ९ विकेट्स घेऊन तिने क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे.





