Satara | लोणंदमधील विविध विकासकामांचा शुभारंभ उत्साहात

लोणंद, (प्रतिनिधी) – लोणंद मधील प्रभाग १४ व १७ याठिकाणच्या विविध विकासकामांचा शुभारंभ तसेच पूर्ण झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळा आ. मकरंद पाटील यांचे जेष्ठ बंधु मिलिंददादा पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
लोणंद मधील प्रभाग क्रमांक १४ या ठिकाणी नगरसेविका सुप्रिया गणेश शेळके यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेले पुजारी घर ते दत्तात्रय घुले घर ते रंगरेज घर ते इंगळे घर रस्ता काँक्रिट करणे व बंदिस्त गटर करणे या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
तर उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर यांच्या प्रभाग क्रमांक १७ मधील जुना निंबोडी रोडवर ठोंबरे मळा ते गोटेमाळ येथील राजमाता नगर या नवीन वसाहती पर्यंत आकर्षक सजावटीचे पथदिवे बसविण्यात आले आहेत, या कामाचे लोकार्पण मिलिंद पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बाजार समितीचे सभापती सुनील शेळके, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दयानंद खरात, नगराध्यक्षा सीमा वैभव खरात, उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर,
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विनोद क्षीरसागर, माजी सरपंच एडव्होकेट सदाशिवराव शेळके-पाटील, जेष्ठ नेते एन डी क्षीरसागर, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणतात्या शेळके, शंकरराव क्षीरसागर,
नगरसेविका सुप्रिया गणेश शेळके, नगरसेवक भरत बोडरे, सागर शेळके, प्रवीण व्हावळ, एडव्होकेट गजेंद्र मुसळे, एड. गणेश शेळके, निलेश शेळके, वैभव खरात,
गौरव फाळके, गणपतराव शिंदे, प्रणय राऊत, संतोष शेळके, अशोक क्षीरसागर, कासमभाई शेख, शफी इनामदार, बाळासाहेब शेळके, पांडुरंग शेळके, संजय कुंभार, उदय शिंदे तसेच प्रभागातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते.





