पिंपरी | पाटण ग्रुपग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

कार्ला, (वार्ताहर) – विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱया पाटण – बोरज ग्रुप ग्रामपंचातीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. मावळचे आमदार सुनील शेळके यांंच्या माध्यमातून ५ कोटी ८० लाख ३६ हजार निधी उपलब्ध झाला असून त्यातून होणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन सरपंच प्रवीण तिकोणे व उपसरपंच सोनाली सणस, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय केदारी, विजय तिकोणे, दशरथ कदम, सदस्या सुनिता तिकोणे, शालन शिळवणे, प्रमिला कोंडभर, मालता केदारी उपस्थित होते.
पाटण येथे मळवली-बोरज ग्रा.मा. १७३ काँक्रीटिकरण, पाटण येथे ओढ्यावर साकव पूल बांधणे, बोरज येथे अंतर्गत रस्ता, अभिनव घरकुल सोसायटी, पाटण गाव अंतर्गत रस्ता, सुदामनगरी येथे अंतर्गत रस्ता, पाटण येथील ठाकर वस्ती येथे नवीन १०० के.व्ही.ए. क्षमतेचा विद्युत रोहित्र बसवणे या मंजूर झालेल्या विकासकामांचे भुमिपूजन करण्यात आले. या वेळी तंटामुक्ती अध्यक्ष विजय जाधव,
ग्रामसेवक राजेंद्र खरात, पै. संदीप तिकोणे, पंकज तिकोणे, लिपीक गणेश केदारी, दिनेश केदारी, काळुराम सणस, संदीप तिकोणे, शंकर तिकोणे, नंदू तिकोणे, श्रीकांत तिकोणे, अभय घोडके, प्रमोद घोडके, हनुमंत तिकोणे, अक्षय तिकोणे, पांडुरंग कोंडभर, बाळू साठे, नाथा तिकोणे, जयवंत तिकोणे, वसंत जाधव, लहू रसाळ, भाऊ पटेकर, अतुल घोडके आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप तिकोणे यांनी केले. आभार प्रवीण तिकोणे यांनी मानले.





