Uddhav Thackeray : ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा हादरा; माजी आमदाराने सोडली साथ, ‘या’ पक्षात केला प्रवेश
Uddhav Thackeray : लातूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. औशाचे माजी आमदार दिनकरराव माने यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Uddhav Thackeray : राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. नगरपालिकांपासून महानगरपालिकांपर्यंत पार पडलेल्या निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, औसा मतदारसंघाचे माजी आमदार दिनकरराव माने यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.लातूरमध्ये झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपाचे
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan )यांच्या उपस्थितीत माजी आमदार दिनकरराव माने यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्तेही भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
उपजिल्हा प्रमुख संतोष सूर्यवंशी, तालुका प्रमुख आबासाहेब पवार, तालुका संघटक श्रीराम कुलकर्णी, माजी तालुका प्रमुख संजय उजळबे, तालुका समन्वयक प्रदीप रणखांब, उपतालुका समन्वयक महादेव साळुंखे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
औसा तालुक्यातील (जि.लातूर) पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपा परिवारात प्रवेश !
📍पक्ष प्रवेश करणारे मान्यवर-
औसा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिनकरराव माने, उप जिल्हा प्रमुख संतोष सूर्यवंशी, तालुका प्रमुख आबासाहेब पवार, तालुका संघटक श्रीराम कुलकर्णी, माजी तालुका प्रमुख संजय… pic.twitter.com/JkRz7X9iIU— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) January 26, 2026
भाजपची ताकद वाढली, ठाकरे गटाला फटका
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला आमदार अभिमन्यू पवार, भाजप लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील-कव्हेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या घडामोडीमुळे लातूर जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद कमी झाली असून भाजप अधिक मजबूत झाला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शिवसेना का सोडली?
Dinkarrao Mane Joins BJP Latur
भाजपमध्ये प्रवेश करताना दिनकरराव माने म्हणाले, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना लातूर जिल्ह्यात शिवसेना सक्षमपणे उभी करण्याचं काम आम्ही केलं. लोकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं, दोन वेळा आमदार केलं. मात्र त्यानंतर शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाचं लातूरकडे दुर्लक्ष झालं.
संघटना कमजोर होत गेली, शिवसैनिकांची कामे वेळेवर होत नाहीत, सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही. महाराष्ट्राचे सक्षम नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या नेतृत्वात सर्वसामान्यांसाठी काम करण्याच्या उद्देशाने मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.





