Latur Accident : महाराष्ट्रात अपघातांचे सत्र सुरूच! दोन दिवसांत ६ जणांचा मृत्यू; कार-जीपच्या धडकेत तिघांचा अंत, १७ गंभीर
Latur Accident : लातूर जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत दोन अत्यंत भीषण आणि काळीज हेलावून टाकणारे रस्ते अपघात घडले असून यात एकूण ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Latur Accident : लातूर-नांदेड महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना जिल्ह्यात आणखी एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. लातूरमधील बुधोडापाटीजवळ मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Latur Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर-तुळजापूर महामार्गावरच्या बुधोडापाटी येथे कार आणि जीपचा मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहत. (Latur Accident)
लातूरच्या दिशेने येणा-या जीप गाडीला भरधाव वेगात येणा-या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात मृत्यू पावलेली ही व्यक्ती धाराशिव जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. (Latur Accident)
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने अपघातात मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. तर जखमींवर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी अपघातानंतर महामार्गावर झालेली वाहतूक सुरळीत केली. (Latur Accident)
तत्पूर्वी, लातूर-नांदेड महामार्गावरील अलगरवाडी पाटीजवळ शनिवारी भीषण अपघाताची घटना घडली. कंटेनर, कार आणि दुचाकी या तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघात दुचाकीवर प्रवास करणारे पती-पत्नी आणि कारमधील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झालेत. (Latur Accident)





