लातूरकरांची चिंता मिटली! मांजरा धरण ९०% पेक्षा अधिक भरले
Updated On:
लातूर : मराठवाड्यात दोन दिवसांपासून सुरू असणा-या मुसळधार पावसाने बीड, धाराशिव लातूर जिल्ह्याला तडाखा बसला. यामुळे लातूर शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण ९०% पेक्षा अधिक भरल्यामुळे पिण्याच्य पाण्याची चिंता मिटली आहे.
तसेच धरण धरल्याने प्रशासनाने दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. मांजरा धरणातील ४ वक्रद्वारे प्रत्येकी ०.२५ मीटर उंचीने उघडून ३४९४.२८ क्यूसेक्स (९८.९६ क्यूमेक्स) इतका विसर्ग मांजरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
पुढील पावसाच्या स्थितीनुसार विसर्गात बदल करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. नदीकाठावरील तसेच पुरामुळे बाधित होऊ शकणा-या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोणीही नदीपात्रात उतरणार नाही.जीवित अथवा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. अशा सूचना करण्यात आल्या आहेत .





