Latur News : कुरिअरच्या वाहनातून पार्सल उतरवताना भीषण स्फोट; कर्मचारी गंभीर भाजला
Latur News : शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाकडे (जीएमसी) जाणाऱ्या समांतर रस्त्याच्या डाव्या बाजूस अनेक खाजगी कुरिअर कंपन्यांची कार्यालये आणि दुकाने आहेत.

Latur News : शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाकडे (जीएमसी) जाणाऱ्या समांतर रस्त्याच्या डाव्या बाजूस अनेक खाजगी कुरिअर कंपन्यांची कार्यालये आणि दुकाने आहेत. (Latur News)
आज (31 ऑक्टोबर) सकाळी सकाळी एका खासगी कुरिअर कंपनीच्या वाहनातून पार्सल उतरवत असताना अचानक भीषण स्फोट झाला. यात कुरिअर कंपनीचा एका कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, पार्सलमध्ये बंदूक सापडल्याने पोलीस अलर्ट मोडवर आहेत. (Latur News)
मिळालेल्या माहितीनुसार, इतर शहरांतून पार्सल घेऊन कुरिअर कंपनीचे मालवाहू वाहन दुकानासमोर आले. त्यानंतर वाहनातून पार्सल काढण्याचे काम सुरू झाले. मात्र त्याचवेळी एका पार्सलचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका तीव्र होता की टेम्पोचे छत आणि काचा फुटून वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. (Latur News)
धक्कादायक म्हणजे स्फोटाच्या क्षणी पार्सल हाताळत असलेला कर्मचारी थेट आगीच्या आणि धुराच्या लोटात सापडल्याने गंभीररीत्या भाजला. अशावेळी प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी कसलाही वेळ न दवडता जखमी कर्मचाऱ्याला उपचारासाठी तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. (Latur News)
या स्फोटाची माहिती मिळताच लातूर पोलीस, श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमने तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. याचवेळी स्फोट झालेल्या वाहनात एक बंदूक आढळून आली. (Latur News)
त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. याशिवाय हा स्फोट कशामुळे झाला? पार्सलमध्ये ज्वलनशील अथवा स्फोटक पदार्थ होते का? पार्सल नेमके कोणी आणि कुठून पाठवले? या पार्सलबाबत कुरिअर कंपनीला पूर्वकल्पना होती का? अशा सर्व दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. (Latur News)





