Ankita Lokhande : टेलिव्हिजनवर ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने चित्रपटसृष्टीतही लोकप्रसिद्ध मिळवली आहे. अंकिता तिच्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी सतत संपर्कात असते. नुकताच तिने एक डान्स व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून बॅालीवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षित हिची आठवण येत आहे. अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या अद्भुत नृत्य प्रतिभेचे दर्शन घडवताना दिसत आहे. या व्हिडीओला आणखी खास बनवणारी गोष्ट म्हणजे अंकिता ज्या गाण्यावर नाचत आहे. त्या गाण्यावर माधुरीने नृत्यविष्कार सादर केला होता. या व्हिडीओमध्ये अंकिता माधुरी दीक्षितच्या “पालकी में होके सवार चली रे” या हिट गाण्यावर बेंधूद होत डान्स करत आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. View this post on Instagram A post shared by Ankita Lokhande jain (@lokhandeankita) १९९३ मध्ये आलेल्या ‘खलनायक’ या चित्रपटातील हे गाणं असून, या चित्रपटातील सगळ्याच गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, अंकिता लोखंडेच्या डान्सने पुन्हा एकदा संगीतप्रेमींना या गाण्याची आठवण करून दिली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अंकिता लोखंडेने लिहिले की, ८० आणि ९० च्या दशकातील गाणी फक्त ऐकली जात नव्हती, तर ती जाणवली जातात, असे म्हटले आहे. पुढे अभिनेत्रीने, पालकी में होके सवार चली लै. माधुरी दीक्षित एक एहसास. या पिढीला आवाज मिळेल, पण भावना नाही, असे म्हटले आहे. ८० च्या दशकात जन्माला आल्याने मी भाग्यवान आहे, कारण तिथूनच माझे स्वप्न पाहण्याची आणि शिकण्याची सुरुवात झाली आणि आजही मी शिकत आहे, असे म्हणत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. व्हिडीओमधील अंकिताच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, ती निळ्या रंगाच्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. हेही वाचा : “जे हिंदुत्वाचे नाही झाले, ते मराठी माणसांचे काय होणार!”; महापालिका निवडणुकीची घोषणा होताच ठाकरे बंधुविरोधात मुंबईमध्ये पोस्टर