Lashkar terrorists: मोठी बातमी ! लश्करचा दहशतवादी शब्बीर अहमदला अटक ; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
Lashkar terrorists: दिल्लीतील सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि केंद्रीय यंत्रणांनी शब्बीर अहमद लोन या दहशतवाद्याला दिल्लीच्या सीमेवरून अटक केली आहे.

Lashkar terrorists: दिल्लीतील सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि केंद्रीय यंत्रणांनी शब्बीर अहमद लोन या दहशतवाद्याला दिल्लीच्या सीमेवरून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शब्बीर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सांगण्यावरून बांगलादेशातून एक नवीन मॉड्यूल तयार करत होता.
लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी शब्बीर अहमद लोन याला दिल्लीच्या सीमेवरून अटक करण्यात आली आहे. तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सांगण्यावरून बांगलादेशातून एक नवीन लष्कर-ए-तोयबाचे मॉड्यूल तयार करत होता. Lashkar terrorists
प्राथमिक तपासात असेही उघड झाले आहे की, तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी भारतात लश्कर-ए-तोयबाचे एक नवीन मॉड्यूल स्थापन करण्याच्या तयारीत होता. एका गुप्त माहितीच्या आधारे त्याला दिल्लीच्या सीमेवर अटक करण्यात आली. Lashkar terrorists
फेब्रुवारी महिन्यात दिल्ली पोलिसांनी केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान, शब्बीर अहमद लोनचे नाव लश्कर-ए-तोयबाच्या एका मॉड्यूलचा सूत्रधार म्हणून समोर आले होते. मूळचा जम्मू आणि काश्मीरचा असलेला लोन बांगलादेशात राहत असल्याचे म्हटले जाते.
Shabir Ahmed Lone, LeT terrorist, handler of the recently busted LeT module in Metro Poster Case, has been arrested by a team of Special Cell/NDR: Delhi Police
— ANI (@ANI) March 30, 2026
सुरक्षा दलांना एक गुप्त माहिती मिळाली होती, ज्यानंतर संपूर्ण योजना तयार करण्यात आली होती. दिल्ली पोलीस आणि सुरक्षा दलांनी सापळा रचून दिल्लीच्या सीमेवर या दहशतवाद्याला पकडले. प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, दहशतवादी शब्बीर सीमेपलीकडून मिळणाऱ्या निर्देशांनुसार भारतविरोधी कारवाया करण्याच्या मोहिमेवर होता. Lashkar terrorists
तपास यंत्रणांनी आता शब्बीरच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे. शब्बीरचे आणखी साथीदार दिल्लीत असण्याची शक्यता सुरक्षा दलांना वाटते. चौकशीच्या आधारे पोलिसांनी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.





