Bangladesh Bus Accident: लोकांच्या डोळ्यादेखत ५ सेकंदात प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली ; २३ जणांचा मृत्यू, पहा शेवटचा व्हिडीओ
Bangladesh Bus Accident:बांगलादेशमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली एक बस खोल नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Bangladesh Bus Accident: बांगलादेशमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली एक बस खोल नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात २३ प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला. बसमध्ये अनेक मुलांसह अंदाजे ४० जण प्रवास करत होते.
समोर आलेल्या माहितीनुसार, ईदच्या सुट्ट्या साजरे करून प्रवासी ढाक्याला परतत असताना हा भीषण अपघात घडला. बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळी घडला.
क्रेनच्या साहाय्याने बस नदीतून बाहेर काढली Bangladesh Bus Accident:
अपघातानंतर क्रेनच्या साहाय्याने बस नदीतून बाहेर काढण्यात आली. परिस्थिती अत्यंत कठीण होती. खराब हवामानामुळे बचावकार्य अवघड झाले होते. बस बाहेर काढण्यासाठी अंदाजे सहा तास लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, फेरीमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना बसचा तोल गेला आणि ती पद्मा नदीत कोसळली. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. लष्कर, पोलीस, अग्निशमन दल आणि तटरक्षक दलाची पथके संयुक्तपणे बचावकार्य करत आहेत.
आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू Bangladesh Bus Accident
#Bangladesh | Bus with dozens of passengers plunges into Padma River in Rajbari; rescue operations underway
The incident occurred at around 5:15 pm at Daulatdia Ghat No. 3, when the Dhaka-bound bus lost control while attempting to board a ferry and fell from a pontoon into the… pic.twitter.com/rG1pNKBG4u
— DD News (@DDNewslive) March 25, 2026
फेरीमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना बस नदीत कोसळली. बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू असून, मृतांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले जात आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ५:१५ च्या सुमारास नैऋत्येकडील राजबारी येथील दौलाडिया टर्मिनलवर बस पद्मा नदीत कोसळल्याने हा अपघात झाला.
बस नदीत कशी कोसळली? Bangladesh Bus Accident:
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ढाक्याकडे जाणाऱ्या या बसमध्ये ४० प्रवासी होते. दौलाडिया टर्मिनलवर फेरीमध्ये चढत असताना ती नदीत कोसळली.
प्रत्यक्षदर्शींनी असेही सांगितले की, ४० प्रवासी असलेली बस फेरीच्या जवळ पोहोचत असताना एका लहान बोटीला धडकली. या धडकेमुळे बसचा तोल गेला आणि ती थेट खोल नदीत कोसळली.






