Lara Dutta Daughter : लारा दत्ताचा लेकीसोबत धमाल डान्स; सायराचा अंदाज पाहून सारेच थक्क
Lara Dutta Daughter :

Lara Dutta Daughter : बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता सध्या सिनेसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह असते. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते. अलिकडेच तिने तिच्या लेक सायरासोबतचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघी मायलेकींची भन्नाट जुगलबंदी पाहायला मिळत आहे.
लारा आणि सायरा या दोघींनी केंट जोन्सच्या ‘डोन्ट माइंड’ या फेमस गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडीओ लाराने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबतच तिने मजेशीर कॅप्शन दिलं आहे.
”आपल्या मुलांना खूश करण्यासाठी माणूस काय-काय नाही करत. हे म्हणजे तर आता आई-वडिलांसाठी निर्लज्जपणाची सीमा पार केल्यासारखं झालंय”,असं कॅप्शन लाराने दिलं आहे. तिच्या या कॅप्शनवरुन लेकीच्या आग्रहाखातर तिने हा डान्स केल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ समोर येताच चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही त्यावर प्रेमाचा वर्षाव केला. Lara Dutta Daughter
View this post on Instagram
लाराने या व्हिडीओमध्ये ग्रे कलरचा लूज टी-शर्ट आणि नेव्ही कलरची लेगिंग्स परिधान केली आहे. तर, सायराने डार्क कलरची लेगिंग्स आणि ओव्हरसाईज ब्राऊन स्वेटशर्ट घातला आहे.
दरम्यान, लारा दत्ता आणि माजी टेनिसपटू महेश भूपती यांनी २०१२ मध्ये सायराचे जगात स्वागत केले होते. कामाबद्दल बोलायचे झाले तर, लारा शेवटची ‘रणनीति: बालाकोट अँड बियॉन्ड’मध्ये दिसली होती. येणाऱ्या काळात ती अक्षय कुमार आणि वामीका गब्बी यांच्यासोबत ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात दिसेल, जो जून २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. Lara Dutta Daughter :
याशिवाय, ती नितेश तिवारींच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटात राणी कैकेयीची महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर आणि साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहेत.
हेही वाचा:





