पुणे | साडेतीन शक्तिपीठासाठी धावणार लालपरी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गणेशोत्सवानंतर आता नवरात्र उत्सवातील साडेतीन शक्तिपीठ दर्शनासाठी पुणे एसटी विभागाकडून जादा बस सोडण्यात येणार आहे. तसेच ग्रुप बुकिंही करता येणार आहे.
महामंडळाच्या स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगारातून नवरात्रोत्सवात साडेतीन शक्तिपीठ दर्शनासाठी एसटी बस सोडण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड आगारातून ५ ऑक्टोबरलाबस रवाना होणार आहेत. साडेतीन शक्तिपीठ दर्शनासाठी एसटीचे २ हजार ६८५ रुपये तिकीट असणार आहे.
भाविकांना राहण्याचा, जेवण आणि दर्शन पासचा खर्च स्वतःला करावा लागणार आहे. कोल्हापूरमधील दर्शन झाल्यानंतर बस तुळजापूरला जाईल. दुसर्या दिवशी (दि. ६) तुळजापूरहून माहूर येथे बसचा मुक्काम असणार आहे.
तिसर्या दिवशी (दि. ७) नाशिक, वणी येथे दर्शन होईल. त्यानंतर बसचा पिंपरी-चिंचवडसाठी परतीचा प्रवास सुरू होईल, अशी माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी दिली.





