सोलापूरात कॅनरा बँकेला लाखाेंचा गंडा; सोनारासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर – सव्वादोन किलो बनावट सोने खरे असल्याचे भासवून १४ सोनारांनी मिळून सोलापुरात कॅनरा बँकेतून ८५ लाख ९३ हजार ३०० रुपयांचे सोने तारण कर्ज घेत बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोनारासह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार कॅनरा बँकेच्या पश्चिम पेठ शाखेसह सात रस्ता, चाटी गल्ली आणि मजरेवाडी या चार शाखांमध्ये गेल्या १ फेब्रुवारी ते २८ मे या कालावधीत घडला. याबाबत बँकेचे मुख्य व्यवस्थापक अनिलकुमार बालाजी शहापूरवाड (वय ४४) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संबंधित सोनारासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सुनील वेदपाठक या सोनारासह जावेद वजीर शेख, हुसेन पापा शेख, युवराज ढेरे, कार्तिक सरसंभी, जुबेर जहाँगीर मुल्ला, भुजंग शेळके, जयवंत ढेकळे, जैनोद्दीन शेख, सोमनाथ शेळके, सुरेश मुळे, गहिनीनाथ शिंदे, कादीर मलिक पठाण आणि उत्तरेश्वर मल्लिकार्जुन बोबे (सर्व रा. सोलापूर) अशी या गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपींची नावे आहेत.
यातील सुनील वेदपाठक सुवर्णकारास कॅनरा बँकेच्या चार शाखांसाठी मानधन तत्वावर सोनार म्हणून लेखी कराराद्वारे अधिकृतपणे नियुक्त करण्यात आले होते.





