ठेकेदाराच्या निष्कजीपणामुळे रस्त्यावरील पाणी दुकानात शिरून लाखोंचे नुकसान

जामखेड – जामखेड -सौताडा महामार्गाचे काम सध्या बीड रोड येथे सुरु असून ठेकेदाराने अर्धवट केलेल्या गटारीचे पाणी थेट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत असलेल्या मुक्ताई कृषी सेवा केंद्र,कालिका गॅस एजन्सी,अमृत पशु खाद्य या दुकानात जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सध्या सुरु असलेले रस्त्यासह गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होताना दिसत असून याचा फटका सर्वसामान्य दुकानदारांना होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे जामखेड सौताडा महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षपासून सुरु असून सदरील काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा अनेक तक्रारी नागरिकांनी करूनही राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी शाखाअभियंता ”अर्थपूर्ण” दुर्लक्ष करत आहेत दरम्यान बीड रोड येथील ,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील रस्त्याचे एक बाजूचे काम पूर्ण होऊन दुसऱ्या बाजूने कामाला आहे.
रस्ते करताना आधी गटारीचे काम होणे आवश्यक असताना सामन्धीत ठेकेदाराने आधी रास्ता पूर्ण करून नंतर गटारीचे काम हाती घेतले आहे मात्र सदरील गटारीचे अर्धवट व निकृष्ट दर्जाचे काम चालू असून गेल्या दोन ते तीन शहरात मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी साचत आहे अर्धवट राहिलेल्या गटारीच्या कामामुळे रस्त्यावरील पाणी थेट मुक्ताई कृषी सेवा केंद्र व अमृत पशु खाद्य दुकानात शिरून दोन्ही दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबत मुक्ताई कृषी सेवा केंद्राचे संचालक प्रवीण जरे तहसीलदार गणेश माळी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून संबंधित ठेकेदारामुळे दुकानाचे जवळपास ३ ते ४ लाखाचे नुकसान झाले असून घटनेची चौकशी करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे याबाबत आ रोहित पवार आ राम शिंदे यांचेही संबंधित ठेकेदाराला पाठिशी घालण्याचे काम तर सुरू नाही ना अशी चर्चा जामखेड मध्ये होत आहे.





