Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तारीख आली समोर
राज्य सरकारने योजनेसाठी 344 कोटी रुपयांचा निधी वर्ग केल्याची माहिती समोर आल्याने लाभार्थीना दिलासा मिळाला आहे.

Ladki Bahin Yojana – राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एकीकडे पडताळणी प्रक्रियेनंतर लाखो महिला योजनेतून अपात्र ठरत असताना, दुसरीकडे पात्र लाभार्थी महिलांना मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने योजनेसाठी 344 कोटी रुपयांचा निधी वर्ग केल्याची माहिती समोर आल्याने लाभार्थीना दिलासा मिळाला आहे. महिला व बालविकास विभागाकडून लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ते जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
निधी वितरणासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आल्याने मे महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 12 ते 15 जून दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या हप्त्यासाठी 344 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
प्रशासनाकडून जिल्हानिहाय लाभार्थीची माहिती, बँक खात्यांची पडताळणी आणि पात्रतेची अंतिम छाननी सुरू असल्याने काही भागांत हप्ता जमा होण्यास विलंब होत असल्याचेही सांगितले जात आहे.






