Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणी’ला खाली हाताने पाठवणार नाही.! भाऊबीजेलाही ओवाळणी देणार; अजित पवारांची मोठी घोषणा

Ajit Pawar । Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन महिलांच्या बँक खात्यात जमा झाले होते.
यानंतर आता सप्टेंबर महिन्याचे पैसे देखील महिलांच्या बँकेत जमा होताना दिसत आहेत. 29 सप्टेंबर पासून महिलांच्या खात्यात तिसरा हफ्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे तीन हफ्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले असून आत्तापर्यंत तब्बल 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ झाला आहे.
त्यामुळे, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला अधिक खुश आहेत. दरम्यान, अश्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
रक्षाबंधन सणाच्या अगोदर महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले होते. तसेच काहीसं दिवाळीच्या भाऊबीजलेही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. जनसन्मान यात्रे दरम्यान बोलताना अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “राज्यात ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत, त्या त्या ठिकाणी मी जनसन्मान यात्रा घेऊन जात आहे. विरोधक टीका करतात, पण आमच्या अंगाला काही भोक पडत नाहीत.
ते सत्तेत असताना कोणती योजना आणली? मात्र, माता माऊलींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली आहे. तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे कधीही केव्हाही काढू शकता. आम्ही दिलेल्या योजना पाच वर्षे चालण्यासाठी घड्याळा चिन्हाला तुम्हाला मतदान करावे लागेल.
मी बोलतो तसा वागतो, हा अजितदादांचा वाद आहे. रक्षाबंधनला जसे तीन हजार रुपये दिले तसेच भाऊबीजेला देखील माझ्या बहिणीला मी खाली हाताने पाठवणार नाही तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार हाच माझा वादा आहे, असे म्हणत भाऊबीजेलाही ओवाळणी मिळणार असल्याची घोषणाच अजित पवारांनी केली.





