Smriti Irani : स्मृती इराणी बनल्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्री; दीपिका पादुकोणलाही टाकलं मागे, आकडा ऐकून उडतील होश!
Kyunki Saas bhi kabhi bahu thi 2 | Smriti Irani : हिंदी टेलिव्हिजन जगतातील एक काळ गाजवलेली मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तब्बल १७ वर्षांनंतर, ही मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ या नावाने दि. २९ जुलै २०२५ पासून प्रसारित झाली आहे.
नवीन सीझन डीडी नॅशनल चॅनलवर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवला पाहायला मिळत आहे. प्रत्येक दिवशी सकाळी ९ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेची ओळख असलेली ‘तुलसी’ अर्थातच स्मृती इराणी पुन्हा चर्चेत आली आहे. तिच्या या भूमिकेने ती घराघरात पोहोचली होती आणि भारतीय टेलिव्हिजनमध्ये एका आदर्श सूनबाईची प्रतिमा निर्माण केली होती.
पहिल्या सीझनचा शेवट कसा झाला होता?
२००८ मध्ये या मालिकेचा पहिला सीझन संपला होता. शेवटच्या भागात तुलसीने आपल्या मुलाचा अनुजचा खून केला होता, कारण तो एका तरुणीवर बलात्कार करणार होता. कोर्टात हे उघड झाल्यानंतर कथेत २० वर्षांची उडी घेतली गेली होती आणि पुढच्या पिढ्यांची कहाणी दाखवण्यात आली होती.
स्मृती इराणी बनल्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्री :
मिळालेल्या माहितीनुसार, स्मृती इराणी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी १४ लाख रुपये फी घेत आहेत, ज्यामुळे त्या भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री बनल्या आहेत. तसेच, या शो चे १५० एपिसोड प्रसारित होणार आहेत, त्यामुळे स्मृती ईरानी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ मधून तब्बल २१ कोटी रुपये कमावणार आहेत.
मानधनाच्या बाबतीत ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला मागे टाकले :
स्मृती ईरानीने फीच्या बाबतीत बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री दीपिका पादुकोणलाही मागे टाकले आहे. सांगितलं जातं की, दीपिकाला शाहरुख खानच्या ‘पठान’ चित्रपटासाठी १५ कोटी रुपये फीस मिळाली होती, तर स्मृती ईरानी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ शोमधून २१ कोटी रुपये कमावणार आहेत.
या सोबतच ‘अनुपमा’ या शोच्या लीड अभिनेत्री रूपाली गांगुलीला दर एपिसोडसाठी सुमारे ३ लाख रुपये मिळतात. हिना खानची फीस २ लाख रुपये पर्यंत आहे, आणि ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शोमध्ये जेठालालचा भूमिका करणारे दिलीप जोशी दर एपिसोडसाठी १.५ लाख रुपये घेत आहेत. त्यामुळे या सर्व कलाकारांच्या रेस मध्ये स्मृती इराणी पुढे असल्याचं दिसून येत आहे.





