Golden Boot Race : मेस्सी-एम्बाप्पेमध्ये ‘गोल्डन बूट’साठी रस्सीखेच! दोघांचेही ८-८ गोल्स; पण फिफाच्या ‘या’ नियमामुळे एम्बाप्पे आघाडीवर
Golden Boot Race : सध्या अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी आणि फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे हे दोघेही प्रत्येकी ८ गोल्ससह संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत. मात्र, तरीही फिफाच्या एका विशेष नियमामुळे एम्बाप्पे सध्या मेस्सीच्या एक पाऊल पुढे आहे कसं ते जाणून घ्या.

FIFA World Cup 2026 Golden Boot Race Kylian Mbappe Lionel Messi Erling Haaland : फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) आता आपल्या अंतिम आणि सर्वात थरारक टप्प्याकडे सरकत आहे. जगज्जेतेपदाच्या लढतीसोबतच स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित ‘गोल्डन बूट’ (Golden Boot) पुरस्काराची शर्यत कमालीची रंजक झाली आहे. सध्या अर्जेंटिनाचा जादूगार लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि फ्रान्सचा वेगवान कर्णधार किलियन एम्बाप्पे (Kylian Mbappe) हे दोघेही प्रत्येकी ८ गोल्ससह संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत. मात्र, तरीही फिफाच्या एका विशेष नियमामुळे एम्बाप्पे सध्या मेस्सीच्या एक पाऊल पुढे आहे. (Golden Boot Race)
फिफाचा ‘टायब्रेकर’ नियम ठरला महत्त्वाचा – (Golden Boot Race)
फिफाच्या अधिकृत नियमांनुसार, जर दोन किंवा अधिक खेळाडूंचे गोल समान असतील, तर ‘टायब्रेकर’ म्हणून ज्या खेळाडूच्या नावावर सर्वाधिक ‘असिस्ट’ (गोल करण्यासाठी सहकाऱ्याला दिलेला पास) असतील, त्याला पुरस्कारासाठी प्राधान्य दिले जाते. या नियमानुसार, किलियन एम्बाप्पेने ८ गोल्ससोबत ३ असिस्ट केले आहेत, तर लिओनेल मेस्सीच्या नावावर ८ गोल्स आणि केवळ १ असिस्ट आहे. यामुळे एम्बाप्पे सध्या अधिकृत शर्यतीत मेस्सीला मागे टाकत पहिल्या स्थानावर विराजमान आहे.
हालँड आणि हॅरी केनचे तगडे आव्हान – (Golden Boot Race)
THE RACE FOR THE GOLDEN BOOT IS AMAZING! 🏆
The world’s best finishers are lighting up the 2026 World Cup. 🔥
🔗 Full details: https://t.co/j1XPB3P3zt#ballondor #worldcup #goldenboot pic.twitter.com/PClfpkph84
— Ballon d’Or (@ballondor) July 10, 2026
गोल्डन बूटची ही लढत केवळ मेस्सी आणि एम्बाप्पेपुरती मर्यादित नाही. नॉर्वेचा गोलमशीन अर्लिंग हालँड (Erling Haaland) ७ गोल्ससह दुसऱ्या स्थानावर असून तो या दिग्गज जोडीच्या थेट पाठीवर आहे. याशिवाय इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन ६ गोल्ससह तिसऱ्या स्थानावर, तर फ्रान्सचा उस्मान डेम्बेले ५ गोल्ससह शर्यतीत आपले अस्तित्व टिकवून आहे.
१०४ सामन्यांच्या महाकुंभातील थरार! (Golden Boot Race)
The race is officially ON for World Cup ultimate individual glory! 👟🧤
From Golden Boot goal machines to Golden Glove brick walls, legendary history is being written on the pitch! ⚽🔥 pic.twitter.com/KCHz6EJZtB
— SportyBet South Africa (@SportyBetZA) July 11, 2026
यापूर्वी २०२२ च्या कतार विश्वचषकात एम्बाप्पेने ८ गोल करून गोल्डन बूटवर नाव कोरले होते, तर मेस्सी ७ गोल्ससह दुसऱ्या स्थानावर राहिला होता. यंदाच्या २०२६ च्या विश्वचषकात ४८ संघ सहभागी झाले असून एकूण १०४ सामने खेळवले जात आहेत. सामन्यांची संख्या वाढल्यामुळे गोलचा पाऊस पडत असून स्पर्धा अतिशय तीव्र झाली आहे. आता आगामी उपांत्य (सेमीफायनल) आणि अंतिम सामन्यांमधील कामगिरीच या ऐतिहासिक पुरस्काराचा खरा मानकरी ठरवणार आहे.





