Kumar Sangakkara Statement : राजस्थान रॉयल्सच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह, कुमार संगकारा यांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, ‘ही गोष्ट अजिबात…’
Kumar Sangakkara Statement : रियान पराग आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्यांकडून झालेल्या काही नियमांच्या उल्लंघनामुळे संघाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.

RR head coach Kumar Sangakkara statement on Team : आयपीएल २०२६ च्या हंगामादरम्यान राजस्थान रॉयल्स संघातून एक अत्यंत धक्कादायक आणि शिस्तभंगाची घटना समोर आली आहे. संघाचा कर्णधार रियान पराग आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्यांकडून झालेल्या काही नियमांच्या उल्लंघनामुळे संघाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. यावर राजस्थान रॉयल्सचे मुख्य कोच कुमार संगकारा यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
पराग आणि मॅनेजरवर दंडात्मक कारवाई –
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये रियान पराग ई-सिगारेट ओढताना आढळला होता. याप्रकरणी त्याला खेलभावनेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्याची २५ टक्के मॅच फी कापण्यात आली आहे. याशिवाय, संघ व्यवस्थापक रोमी भिंडर यांच्यावर डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरल्याबद्दल १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे बीसीसीआयने राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनावरही कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
Kumar Sangakkara has his say on Riyan Parag’s vaping scandal 👀#IPL2026 pic.twitter.com/SL9KKu7oZm
— CricketNews.com (@cricketnews_com) May 1, 2026
याबाबत बोलताना मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा म्हणाले की, “मला वाटते की कोणत्याही प्रकारचा वाद हा निश्चितपणे संघावर एक सकारात्मक प्रभाव पाडत नाही. मी फक्त एवढेच सांगू शकेन की, या दोन्ही घटनांवर बीसीसीआय आणि फ्रँचायझीने योग्य ती पावले उचलली आहेत. आणि संस्कृतीच्या बाबतीत सांगायचे तर, आम्ही नेहमीच एक अत्यंत सकारात्मक आणि निरोगी संस्कृती राखण्याचा प्रयत्न करतो. आमची स्वतःची अशी मूल्ये आहेत, ज्यांचे आम्ही पालन करतो. तसेच खेळाडूंना सतत हीच आठवण करून दिली जाते की, त्यांनी फ्रँचायझी, आपली संस्कृती आणि आपल्या मूल्यांविषयी जबाबदार राहावे.”
रियान परागची खराब कामगिरी –
Kumar Sangakkara on the recent controversies around Rajasthan Royals
▶️ https://t.co/PjzEJRnpny pic.twitter.com/WFP3ElUPg5
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 1, 2026
मैदानावर रियान परागच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, आयपीएल २०२६ च्या हंगामात त्याची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. त्याने आतापर्यंत ९ सामन्यांत केवळ १४.६२ च्या सरासरीने आणि १२४.४६ च्या स्ट्राईक रेटने फक्त ११७ धावा केल्या आहेत. या संपूर्ण हंगामात त्याची सर्वोच्च धावसंख्या केवळ २९ धावा इतकी आहे. मात्र, त्याच्या खराब फलंदाजीनंतरही संगकारा यांनी त्याचे समर्थन केले असून, परागच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आहे.





